How to check SSC Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज म्हणजेच शुक्रवारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला.
राज्याचा निकाल ९३.८३ टक्के इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांनी निकालात घट झाली असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. SSC Result 2023
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे.SSC Result 2023
या लिंकवर पाहू शकता तुमचा निकाल.
गुणपडताळणी कशी करायची असेल तर http://verification.mh-ssc.ac.in या लिंकवर क्लिक करा.SSC Result 2023
कोकण विभागाने मारली बाजी
दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या वर्षी निकाल ९३.८३ लागला आहे. बारावीप्रमाणे दहावीमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे. SSC Result 2023
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत १५ लाख २९हजार ९६ विद्यार्थ्यांपैकी ९३.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागातील ९८.११टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तर नागपूर विभागाचा ९२.०५टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९५.६४ टक्के इतकी आहे.
10वी चा निकाल कसा पाहाल? (How to check SSC Result online)
अधिकृत वेबसाइट — mahresult.nic.in वर लॉग इन करा.
महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लिंकवर जा.
सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव.
लॉगिन करा आणि तुमचा महा10वीचा निकाल तपासा SSC Result
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.