ST bUS Sakal Media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात 1100 एसटी बसेस डिझेल अभावी उभ्या ?

प्रशांत कांबळे ,

मुंबई : कोरोनामुळे कंबरड मोडलेला एसटी महामंडळाचा (ST bus corporation) गाडा अजूनही जाग्यावर येण्याची शक्यता दिसून येत नाही. अपुऱ्या एसटी बसेसच्या (limited st bus) भरवशावर उत्पन्न करण्याचा (earning) महामंडळाने प्रयत्न केला खरी मात्र, अद्याप अपेक्षित प्रवासी संख्या आणि उत्पन्न मिळत नसल्याने महामंडळाची तिजोरी रिकामी झाल्याचे (no funds in corporation) महामंडळाकडून सांगितल्या जात आहे. परिणामी आता डिझेलसाठीही (diesel) पैसे नसल्याने राज्यभरात सुमारे 1100 बसेसच्या फेऱ्या रद्द करून बसेस उभ्या ठेवण्याची वेळ महामंडळावर आली आहे.

ठाणे विभागात गेल्यामहिन्यात डिझेल अभावी बसेस उभ्या ठेवण्याची वेळ आली आहे. त्यासोबतच राज्यात इतर आगरांमध्येही सारखीच परिस्थिती आहे. सध्या एसटीची प्रवासी सेवा पूर्णक्षमतेने सुरू असूनही प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याने दिसून येत आहे.शिवाय कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळला नसून, तिसरी लाट येण्याची शक्यता राज्य सरकारने व्यक्त केल्याने सार्वजनिक प्रवास करण्याचे नागरिकांकडून टाळल्या जात आहे.

त्यामुळे अद्याप एसटीला कोरोनापूर्वी प्रमाणे पूर्णक्षमतेचे प्रवासी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होत असल्याचे दिसून येत आहे. डिझेल अभावी फेऱ्या रद्द केल्यानंतर कर्मचाऱ्यांना सुद्धा बिनपगारी सुट्टी दिली जात असल्याने एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्या जात असल्याचे राज्य एसटी कामगार संघटनेकडून आरोप करण्यात आला आहे.

डिझेल अभावी गाड्या रद्द ही अत्यंत चुकीची बाब आहे. आशिया खंडात सर्वात मोठ्या परिवहन संस्थेला ही वेळ कशामुळे आली यावर विचारमंथन होने आवश्यक आहे. काम करून वेतन मिळत नाही. अशी अवस्था यापुर्वी कधीच आली नाही. राज्यसरकारने तातडीने पावलं उचलून एस टी चे पालकत्व स्विकारणे अत्यंत आवश्यक आहे.

- संदीप शिंदे, अद्यक्ष, राज्य एसटी कामगार संघटना

सध्या डिझेल पुरवठा नियमित आहे. त्यामुळे प्रवासी सेवा सुरळीत सुरू आहे. काही दिवसांपूर्वी 1100 बसेस डिझेल अभावी उभ्या असण्याची परिस्थिती होती.मात्र, आता सर्व आगारांना डिझेल खरेदीसाठी पैसे देण्यात आले आहे.

- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT