Bharat Gogawale Esakal
महाराष्ट्र बातम्या

ST Employees: एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 2019च्या भरतीतील 'या' उमेदवारांना सेवेत सामावून घेणार; गोगावलेंची घोषणा

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई - सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीवरील एकूण १,०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदावर सामावून घेतलं जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली.

सन २०१९ च्या भरतीमध्ये निवड झाल्यापैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भरती मधील प्रतीक्षा यादीवरील सुमारे ३३७ उमेदवारांना नेमणूक देण्याची प्रक्रिया महामंडळात सुरू करण्यात येत आहे. तसेच, प्रतीक्षा यादीवरील उर्वरित सर्व ७२१ उमेदवारांना आवश्यकतेप्रमाणं व रिक्त जागेनुसार राज्या परिवहन सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात संबंधित उमेदवार, लोकप्रतिनिधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अध्यक्ष भरत गोगावले यांना भेटून निवेदन सादर केलं होतं. त्यांच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना तातडीनं नेमणुका देण्याच्या सूचना अध्यक्ष भरत गोगावले यांनी १ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार संबंधितांना नेमणुका देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SLW : मानलं, Shafali Verma! भारतासाठी ‘करो वा मरो’ सामन्यात विश्वविक्रमाची नोंद अन् स्मृतीसोबत सॉलिड सुरूवात

OBC Reservation: मोठी बातमी! ओबीसींमधल्या १५ जातींचा केंद्रीय सूचीमध्ये होणार समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा हिरवा झेंडा

IND vs BAN: भारताच्या वादळी सुरुवातीनंतरही पॉवरप्लेमध्ये बांगलादेशचं वर्चस्व; सूर्याही स्वस्तात बाद झाल्यानं पहिल्यांदाच असं घडलं

Cabinet Meeting: गेंम चेंजर निर्णय! उद्याच्या कॅबिनेट बैठकीत होणार मोठी घोषणा; नॉन क्रिमिलेयरची मर्यादा...

Ratan Tata: रतन टाटांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु

SCROLL FOR NEXT