Maharashtra Budget  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस सांगतात...

कसा तयार होतो राज्याचा अर्थसंकल्प ते जाणून घ्या

सकाळ ऑनलाईन टीम

Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पाच्या घोषणेला सुरुवात झाली आहे. याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करताय. तेव्हा आता राज्याच्या पदरात काय पडणार आहे यावर सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. मात्र राज्याचा अर्थसंकल्प नेमका कसा तयार होतो असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. पण तुम्हाला माहितीये काय? या प्रश्नाचं उत्तर यंदाचा राज्याचा बजेट सादर करणारे देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकातच दडलंय.

काही वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एक पुस्तक लिहीलं होतं. याच पुस्तकात त्यांनी राज्याचा बजेट कसा तयार होतो याबाबत लिहीले आहे. यंदाचा अर्थसंकल्प विशेष असण्यामागचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी केलेली घोषणा. त्यांच्या घोषणेत त्यांनी हा महाराष्ट्राचा महाअर्थसंकल्प आणि जनसंकल्प असेल असे जाहीर केले.

कसा तयार होतो राज्याचा अर्थसंकल्प?

अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नव्हे तर वर्षभरात गाठावयाची उद्दिष्टे आणि त्यासाठी उपलब्ध संसाधने यांचा तो ताळेबंद असतो. आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने जमा व खर्च यांचे वस्तुनिष्ठ अंदाज तयार करणे आवश्यक असते. अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होत असला तरी तो तयार करण्याची व त्याचा आधावा घेण्याची प्रक्रिया वर्षभर सुरु असते.

आगामी वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया साधारणपणे सप्टेंबरमध महिन्यातच सुरु झालेली असते. वर्ष 2023-2024 वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम गेल्या सप्टेंबर महिन्यात सुरु होत असते. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी प्रशासनाने राबवायच्या प्रक्रियेचे वेळापत्रक व सूचना वित्त विभाग जारी करतो. प्रत्येक विभागांतर्गत येणारी सर्व राज्याबाहेरील, राज्यस्तरीय व क्षेत्रीय कार्यालये आपापले खर्चाचे अंदाज संबंधित विभाग प्रमुखांना सादर करतात. (Devendra Fadanavis)

मागील व चालू वर्षातील खर्चाचे कल. येत्या वर्षातील गरजा लक्षात घेऊन हे अंदाज तयार होतात. विभाग प्रमुख छाननी नंतर सदर अंदाज वित्त विभागास सादर करतात. खर्चाप्रमाणे महसूल व जमा याचीही अंदाज अशाच पद्धतीने तयार केले जातात. याशिवाय, केंद्र शासनाकडून मिळणारी अनुदाने, करातील हिस्सा आदी बाबीही लक्षात घेतल्या जातात. या अंदाजांचे महसुली व भांडवालीआणि भारित व दत्तमत असे वर्गीकरण केले जाते. (Budget)

संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये जमा खर्चाचा आढावा घेतला जात असतो. जो खर्च अपेक्षित नव्हता, त्यासाठी ज्याप्रमाणे पुरवणी मागण्या केल्या जातात, त्याचप्रमाणे जेथे अंदाजित केल्याप्रमाणे खर्च होण्याची परिस्थिती नसेल, अशा ठिकाणी रकमा परत घेतल्या जातात. जेणेकरून त्यांचे पुनर्विनियोजन होऊ शकेल. आगामी वर्षाचे अंदाज तयार करण्यापूर्वी चालू वर्षाचे सुधारित अंदाजही तयार केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT