corona update sakal Media
महाराष्ट्र बातम्या

Corona Updates: तिसरी लाट आटोक्यात

राज्यात सहा मंडळांत शून्य मृत्यूंची नोंद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईसह राज्यात आज नव्या रुग्णांची संख्या एक हजाराच्या खाली आहे. तसेच राज्यातील आठपैकी सहा मंडळांमध्‍ये शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्याची चिन्हे आहेत. (Maharashtra Corona Updates)

फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून राज्यातील कोविड रुग्णसंख्येत सातत्याने घसरण होत आहे. आज राज्यात केवळ ८०६ नव्या रुग्णांची नोंद झाली. रविवारी राज्यात १४३७ रुग्ण आढळले; तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. आज मृत्युसंख्येतही घट होत केवळ चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील आठ मंडळांपैकी सहा मंडळांमध्ये शून्य मृत्यूची नोंद झाली. नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, अकोला, नागपूर मंडळात आज एकही मृत्यू झाला नाही. केवळ ठाणे आणि पुणे मंडळात अनुक्रमे एक आणि तीन अशा एकूण चार मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मृत्युदर १.८२ टक्क्यांपर्यंत खाली आला, तसेच एकूण मृतांचा आकडा एक लाख ४३ हजार ५८६ झाला आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत १४ हजार ५२५ पर्यंत आली आहे. दरम्यान. राज्यात आज दोन हजार ६९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत एकूण ७६ लाख ९७ हजार १३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत दोन वर्षांनंतरचा नीचांक

मुंबईत आज कोरोनाची गेल्या दोन वर्षांतील नीचांकी रुग्णसंख्येची नोंद झाली. एप्रिल २०२० नंतर प्रथमच शंभरहून कमी म्हणजेच ९६ रुग्ण आढळले. यापूर्वी १७ एप्रिल २०२० रोजी ७७ रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या आठवड्याभरात २०० पर्यंत खाली आलेली बाधितांची संख्या आज थेट ९६ पर्यंत खाली आला. पॉझिटिव्हिटी दरही कमी होऊन ०.५८ टक्क्यांपर्यंत खाली आला; मात्र दैनंदिन चाचण्यांची संख्याही रोडावली. आज केवळ १६ हजार ४७६ चाचण्या करण्यात आल्या. तसेच आज शहरात केवळ कोरोनाच्या एका मृत्यूची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

Latest Maharashtra News Updates : मुंबईवर कोणी हल्ला केला तर मोदी त्यांना पातळातूनही शोधून काढेन, सोडणार नाही - मोदी

SCROLL FOR NEXT