Hsc result E sakal
महाराष्ट्र बातम्या

HSC Result: बारावीचा निकाल उद्या लागणार, शिक्षणमंत्र्यांची माहिती

कोविड सुरक्षिततेचा विचार करुन शाळा तिथे केंद्रांची सोय करण्यात आली होती

सकाळ डिजिटल टीम

बारावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहिर केला जाणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करुन ही माहिती दिलीय. निकालाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

बारावीच्या निकालाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पहात असतात. कोरोनानंतर बारावीच्या झालेल्या परिक्षांमुळे यंदाच्या निकालाची सगळेच उत्सुकतेने वाट पाहातायत. अखेर तारीख जाहीर झाली आहे. (Maharashtra state board will declare HSC result in this week)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परिक्षांचा निकाल विद्यार्थी खालील वेबसाईटवर पाहू शकतील.

mahresult.nic.in

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

कोविड पार्श्वभूमीवर बारावीची परिक्षा झाली होती. यंदाची परिक्षा ऑफलाईन घेण्यात आली होती. संभ्रमाची स्थितीही होती, पण विद्यार्थी-पालक -शिक्षकांनी बरचं सहकार्य केल्याने ही परिक्षा सुरळीत पार पडली. पेपर तपासणीचं कामही व्यवस्थितपणे पार पडल्याची माहीती राज्य शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावींनी सकाळ डिजिटलला दिलीय. तसंच यंदा परिक्षेदरम्यानचा गोंधळ टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कोविड सुरक्षिततेचा विचार करुन शाळा तिथे केंद्र ही सुविधा लागू केली होती. यामुळे विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचही गोसावी यांनी सांगितलं.

कोरोना पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परिक्षांना सुरुवातीला विरोधही झाला होता. मात्र आता निकालाची तारिख जाहिर झाल्याने विद्यार्धी आणि पालकांची निकालाबाबतची उत्सुकता वाढलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT