मुंबईः गेल्या सहा महिन्यापासून जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे, या काळातही परिचारिका जिवाची पर्वा न करता कोरोनाशी लढत आहेत. या काळात परिचारिकांना फ्रंटलाईन योद्धे असे संबोधून जगभर त्यांचे कौतुक केले जात आहे. मात्र आता महाराष्ट्र राज्यातील परिचारिका संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. विविध मागण्यांसाठी त्यांनी संपावर जाण्याचा पवित्रा घेतला आहे.
काही मागण्यांसाठी त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून रखडवले जात आहे.
त्यामुळे, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने परिचारिकांच्या अतिसंवेदनशील आणि न्यायिक मागण्यांसाठी 1 सप्टेंबर 2020पासून आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे.
1 सप्टेंबर 2020 पासून रुग्णसेवा विस्कळीत न करता काळीफीत आंदोलन आणि निदर्शने करणार आहोत आणि जर तरिही मागण्या मान्य झाल्या नाही. तर, 8 सप्टेंबर 2020 या दिवशी एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात येईल, त्यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपावर जातील असे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या उपाध्यक्ष हेमलता गजबे यांनी सांगितले आहे.
(संपादनः पूजा विचारे)
Maharashtra State Nurses going strike on 1 september
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.