ST News SAKAL
महाराष्ट्र बातम्या

ST News : आता एसटी दर सोमवार, शुक्रवारी साजरा करणार ‘प्रवासी राजा’ दिन

Chinmay Jagtap

Beed Latest Update: प्रवाशांच्या समस्या, तक्रारीवजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलदगतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन बीड विभागातील प्रत्येक आगारात आजपासून (ता.१५) प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे.

या दिवशी विभाग नियंत्रक, हे बीड विभागातील एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतील व त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टिने उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यास मदत होईल.

याबाबत आगारनिहाय वेळापत्रक तयार करण्यात आले असून त्या दिवशी प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा महाविद्यालये यांनी आपल्या समस्या तक्रारी लेखी स्वरुपात संबंधित आगारात सकाळी १० ते २ या वेळेत द्याव्यात.

त्यानुसार विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील. राज्य परिवहन बीड विभागातील आगारात विभाग नियंत्रक यांनी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्तापुर्वक सेवा प्रदान करणेसाठी स प्रवाशांच्या समस्यांचे वेळीच निराकरण होणे अत्यंत आवश्यक असते.

तसे झाल्यास प्रवाशांना समाधानकारक सेवा देणे राज्य परिवहन महामंडळाला शक्य होणार आहे. त्यासाठी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन, या अभिनव योजनेचे आयोजन करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यातील सर्व प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करुन घ्यावे, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाचे बीड येथील विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे, यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Registration : मतदार नोंदणीसाठी एकाच्याच नावावर भरले तब्बल ४६२ अर्ज, काय आहे प्रकरण?

Man Murder by Girlfriend: संशय घेणाऱ्या प्रियकराचा प्रेयसीकडून गुप्तांगावर वार करत खून

Office Toxic Management : वर्क लोडमुळे करून नका मेंदूचा कचरा, असे करा ऑफिसमधील टॉक्सिक वातावरणाशी दोन हात

Vidhan sabha election: 'एक देश एक निवडणूक' कायद्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकांवर होणार परिणाम; तज्ज्ञ सांगतात...

AFG vs SA 1st ODI : ७ बाद ३६ धावा; अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी आफ्रिकेची लावली वाट, ३३.३ षटकांत पूर्ण संघ तंबूत

SCROLL FOR NEXT