ST Bank Election 
महाराष्ट्र बातम्या

ST Bank Election: विजयानंतर सदावर्ते भान विसरले; नथुरामचा फोटो नाचवत कार्यकर्त्यांचा जल्लोष!

एसटी सहकारी बँकेच्या निवडणुकीत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

ST Bank Election: एसटी सहकारी बँकेच्या निवडणुकीत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयाचा कार्यकर्त्यांकडून वाजतगाजत जल्लोष करण्यात आला.

पण या जल्लोषात एक आक्षेपार्ह गोष्टही दिसून आली आहे ती म्हणजे कार्यकर्त्यांनी चक्क महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याचे फोटो नाचवले. त्यामुळं आता यावरुन वाद होण्याची चिन्हे आहेत. (Maharashtra State transport Co operative Bank Election Sadavrte activists dancing with photo of Nathuram Godse)

विजयाचा जल्लोष करतानाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये हातात भगवे झेंडे, गळ्यात भगवे पंचे तसेच डोक्यावर भगव्या टोप्या ज्यावर वंदे मातरम् असं लिहिलेलं आहे. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात कुठल्याही महापुरुषांचे फोटो नव्हते पण एकाच्या हातात नथुराम गोडसेचा फोटो मात्र होता. व्हिडिओमध्ये हे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. (Latest Marathi News)

वैचारिक स्तर नाही - आव्हाड

दरम्यान, या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे. आव्हाड म्हणाले, "काही जणांवर बोलण्यात अर्थ नाही. ज्यांना वैचारिक स्तर नाही त्यांच्याबद्दल काय बोलणार? उद्या ते दाऊद इब्राहिमचे पण फोटो लावतील" (Marathi Tajya Batmya)

सदावर्तेंनी यापूर्वी केलाय गोडसेचा उदोउदो

अखंड भारताच्या फाळणीला काँग्रेस कारणीभूत असून महात्मा गांधी अन्‌ काँग्रेसमुळेच अखंड भारतातून पाकिस्तान वेगळा झाला. त्यामुळं अखंड भारताची मागणी करणारे नथुराम गोडसे देशद्रोही कसे ठरू शकतात? असं विधान दोनच दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलातना ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FM Souza: हायकोर्टाने सांगितला कला आणि अश्लीलतेतील फरक; 'लव्हर्स' अन् 'न्यूड' कलाकृती नष्ट करण्यास दिला नकार

Diwali 2024 Reels and Video: 'दिन दिन दिवाळी..' फोटो अन् व्हिडिओसाठी वापरा 'हे' ट्रेंडी कॅप्शन इंस्टाग्रामवर पोस्ट करताच लाईक्स, व्हियूजचा होईल वर्षाव

Jalgaon Crime News : शाळकरी मुलीचे व्हिडिओ व्हायरल करून ‘ब्लॅकमेलिंग’! दोन संशयितांना अटक; मोबाईल जप्त

'शंभूराज देसाईंचा पराभव हेच उद्धव ठाकरेंचं ध्येय'; पाटणमध्ये तिरंगी लढत शक्य? सत्यजित पाटणकर कोणती भूमिका घेणार?

'इंद्रायणी' मालिकेतील अभिनेत्याचा मोठा गौरव; इंदूच्या दत्तोबांची थेट राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी, पोस्ट शेअर करत म्हणाला-

SCROLL FOR NEXT