Maharashtra tops in tap water supply nashik sakal
महाराष्ट्र बातम्या

नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात महाराष्ट्र अव्वलस्थानी

नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात देशात महाराष्ट्र अव्वलस्थानी पोचला आहे. राज्यात ग्रामीण भागातील ७१ टक्के घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात देशात महाराष्ट्र अव्वलस्थानी पोचला आहे. राज्यात ग्रामीण भागातील ७१ टक्के घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जलजीवन मोहिमेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्रात ग्रामीण भागातील १ कोटी ४५ लाख घरांपैकी १ कोटी २ लाख घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. जलजीवन मिशनतंर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील ५४ लाख २३ हजार म्हणजेच, ३७.१२ टक्के घरांना नळजोडणी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१९ ला लाल किल्ल्यावरुन ‘जल जीवन मोहीम-हर घर जल’ची घोषणा केली होती. त्यातंर्गत २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी पाण्याची चाचणी करण्यासाठीच्या प्रयोगशाळांच्या संख्येत पश्‍चिम बंगाल अव्वलस्थानी आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. दरम्यान, महाराष्ट्रातील ७८ हजार ८०० म्हणजेच, ९२ टक्के शाळा आणि ८५ हजार १७४ म्हणजेच, ९३ टक्के अंगणवाड्यांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील ७२ टक्क्यांहून अधिक कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आणखी एक लाख ८० हजारांहून अधिक कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा होणे बाकी आहे.

नळजोडणीचे प्रमाण

जल जीवनतंर्गत राज्यात नळजोडणी कमी असलेल्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. या जिल्ह्यांतील नळजोडणीचे प्रमाण टक्क्यांमध्ये याप्रमाणे (३१ जुलैच्या आकडेवारीनुसार) :

० नंदूरबार-३५

० गडचिरोली-६०

० वाशिम-६६

० उस्मानाबाद-७७

शेंद्रीपाडा परिसराचे कार्यारंभ आदेश

तास नदीवरील बल्ल्यांवरुन दररोज पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणा प्रवास कराव्या लागणाऱ्या शेंद्रीपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर, जि. नाशिक) येथील आदिवासी महिलांसाठी लोखंडी पूल उभारुन देण्यात आला होता. हा पूल नदीच्या पुरात वाहून गेल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर पुन्हा नवीन लोखंडी पूल उभारुन देण्यात आला आहे. या भागातील आदिवासी कुटुंबांसाठी जलजीवनतंर्गत १ कोटी ९९ लाख रुपयांची निविदा नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाने प्रसिद्ध केली होती. निविदेनुसार प्रत्येक कुटुंबासाठी नळाद्वारे पाणीपुरवठा कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

SCROLL FOR NEXT