नवी दिल्ली : राज्यातील सत्ता संघर्षाच्या वादात आज सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. मात्र, यावरील पुढील सुनावणी उद्या होणार आहे. त्यामुळे राज्यात निर्माण झालेल्या सत्ता संघर्षावरील निकालाबाबत उद्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे. तत्पूर्वी आज न्यायालयात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद झाला. या युक्तीवादादरम्यान न्यायलयाने एकनाथ शिंदे गटाला फटकारलं. (Maharashtra Shiv Sena Vs Eknath Shinde SC Hearing)
शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी घटनेच्या दहाव्या सूचीचा मुद्दा मांडत बंडखोरांनी दुसऱ्या पक्षात विलिन होणे हाच पर्याय असल्याचे म्हटले. त्यावर शिंदे गटाकडून हरिश साळवे यांनी पक्ष सोडले नाहीतर पक्षांतर बंदी का? असा सवाल उपस्थित करत बहुमत गमावलेल्या नेत्यासाठी पक्षांतर बंदी कायदा शस्त्र नाही. असा युक्तिवाद लढवला आहे. कोर्टाने आज शिंदे गट आणि शिवसेनेची बाजू ऐकूण घेतली.
दरम्यान विधानसभा अध्यक्षाच्या अधिकारांसंदर्भात हरिष साळवे यांनी न्यायालयाला ढवळाढवळ करू नये, असा युक्तवाद केला. यावरून न्यायाधिशांनी खडेबोल सुनावले आहे. साळवे म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांना बहुमताने निवडून आणलं आहे. त्यांना निर्णय घेण्यापासून रोखणं आणि त्यांचे अधिकार काढून घेणं घटनाबाह्य ठरू शकतं. त्यामुळे न्यायालयाने ढवळाढवळ करू नये असं म्हटलं.
त्यावर न्यायालयाने शिंदे गटाचे वकील साळवे यांना खडेबोल सुनावत, तुम्ही न्यायालयात आल्यानंतर तुम्हाला १० दिवसांचा वेळ मिळाला. ज्याचा तुम्हाला फायदाच झाला. आता तुम्ही सांगताय, ढवळाढवळ करू नका. हे कस काय शक्य आहे, असा सवाल करत न्यायालयाने राज्यपालांकडून ठराविक एका पक्षालाच सत्ता स्थापनेसाठी बोलविण्याचा मुद्दा समोर करत अनेक मुद्दे महत्त्वाचे असल्याचं सरन्यायाधिशांनी नमूद केलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.