Maharashtra Weather Forecast Sakal
महाराष्ट्र बातम्या

नाशिकसह नागपुरात पाऊस! येत्या तीन तासांत 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Weather Forecast : मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं (IMD) वर्तवला होता. त्यानुसार नागपुरात (Nagpur) आजूबाजूच्या परिसरात पावसाच्या हलक्या सरी, तर नाशिक (Nashik), कळवणमध्ये गारांसह पावसाने हजेरी लावली. तसेच येत्या तीन ते चार तासांत आणखी काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

नाशिक, सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, अमरावती आणि आजूबाजूच्या काही भागात ढगाळ वातावरण होते. काही तासांपूर्वी नाशिक, कळवणमध्ये मुसळधार पाऊस झाला. तसेच नागपुरातही विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. येत्या तीन ते चार तासांत पुन्हा पुणे, नाशिकसह साताऱ्यात घाट माथ्यावर वादळ, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच सकाळपासून ढगाळ वातावरण असलेल्या जिल्ह्यात देखील पावासाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कोकण, मराठवाडासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाची नोंद झाली आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसत असून या हंगामातील पिकांचे नुकसान होतं आहे. राज्यातील काही प्रदेशात गारपीट होत असल्याने पिकांवर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असा अंदाजही वर्तवला जात आहे. ऐन हंगामात कोकणात हलक्या सरी बरसल्या. तसेच नाशिक परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidate First List : विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पुण्यातून एकमेव धंगेकरांचं नाव; वाचा संपूर्ण यादी

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेसचा 'हा' उमेदवार; २०१४ मध्ये दिली होती लढत

Burger: बर्गरमधून विषाणूचा प्रसार; ४९ जणांना बाधा, एकाचा मृत्यू, १० राज्यांमध्ये फैलाव

Maharashtra Assembly Election 2024 : भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना संधी दिलेली नाही, फिल्टर लावूनच उमेदवारांची निवड - जयंत पाटील

Mohol Assembly Election : निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आमदार यशवंत यांनी माने यांनी दाखल केली उमेदवारी

SCROLL FOR NEXT