Maharashtra Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; तर 'या' भागात अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Update : राज्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आजही विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Maharashtra Weather Update : राज्याच्या अनेक भागात कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आजही विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या काही भागात उन्हाचा कडाका तर काही भागात गारपिटीची शक्यता आहे.

अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर जळगाव, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.मुंबई, पुणे, सोलापूर आणि नांदेड या ठिकाणी उन्हाचा कडाका वाढला आहे.

पुण्यात रात्रीही उष्ण हवामान

पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उकाडा बराच वाढला आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्याचे चित्र आहे. दिवसासह आता रात्रीही हवामानातील उष्णता वाढली आहे, मात्र रविवारी (ता. ३१) दुपारनंतर ढगाळ हवामान आणि रात्र उबदार राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

विदर्भात वादळी पावसाचा इशारा

छत्तीसगड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून विदर्भ, अंतर्गत कर्नाटक, ते अंतर्गत तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. रविवारी विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

Farmer : भरपाईपासून ५० हजार शेतकरी वंचित,गतवर्षी रब्बी हंगामात झाले होते पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT