Maharashtra Weather update temperature increased in state may cause heat stroke check details  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra News : सूर्य ओकतोय आग! उष्माघातापासून वाचण्यासाठी काळजी घ्या; राज्यात 'येथे' सर्वाधिक तापमान

रोहित कणसे

खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्या दरम्यान उपस्थित १३ नागरिकांच्या उष्माघाताने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत अनेक जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलं आहेत. यासोबतच राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढल्याने चिंता देखील वाढली आहे.

साधारणतः मे महिन्याच्या मध्यामध्ये वाढणारा उन्हाचा चटका यंदा एप्रिलमध्येच जाणू लागल्याचे पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्याने बहुतांश शहरांतील तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडला आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

सर्वाधिक तापमान 'येथे'

हवामान खात्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, उत्तर महाराष्ट्रातील भुसावळमध्ये ४३.३ अंश सेल्सिअस तापमान होते. ४३.२ अंश सेल्सिअस तापमानासह चंद्रपूर हे राज्यातील दुसरे सर्वात उष्ण शहर ठरले. यासोबतच मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश शहरांतील तापमानाने चाळीशी ओलांडली आहे.

हेही वाचा - What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

राज्यात कुठे किती तापमान?

जळगाव - ४१ अंश

नंदुरबार - ४१ अंश

मालेगाव - ४०.९ अंश

नाशिक - ३७ अंश

शिर्डी - ३७ अंश

संभाजीनगर : ४० अंश

जालना : ३९ अंश

उस्मानाबाद : ३६अंश

परभणी :३९.६ अंश

नांदेड : ३९.०५ अंश

हिंगोली :३५ अंश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Updates : अनिल देशमुख हल्ला प्रकरणाचं AI रिक्रिएशन; विशेष पोलिस महानिरिक्षकांची माहिती

IND vs AUS Viral Video: सर्फराजची कॅचवरून विराट कोहलीने उडवली खिल्ली; ऋषभ पंत तर हसून लोटपोट झाला

Assembly Election 2024 : एसटी बस निवडणूक कर्तव्यावर... प्रवासी स्टॅण्डवर, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचा खोळंबा

Pune Crime : प्रेमसंबंधास नकार; समाज माध्यमावर अश्लील छायाचित्रे टाकून मित्राकडून तरुणीची बदनामी

SCROLL FOR NEXT