weather update  sakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: राज्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आजही पहाटेपासूनच राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील काही भागांमध्ये आजही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. भुसावळमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही मध्यरात्रीपासूनच मुसळधार अवकाळी पाऊसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

2 डिसेंबरपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात मिचांग हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील 3 दिवस राज्यात पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची आणि गारपिटीचा शक्यता आहे. यासह विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने आज यलो अलर्ट दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FM Souza: हायकोर्टाने सांगितला कला आणि अश्लीलतेतील फरक; 'लव्हर्स' अन् 'न्यूड' कलाकृती नष्ट करण्यास दिला नकार

Diwali 2024 Reels and Video: 'दिन दिन दिवाळी..' फोटो अन् व्हिडिओसाठी वापरा 'हे' ट्रेंडी कॅप्शन इंस्टाग्रामवर पोस्ट करताच लाईक्स, व्हियूजचा होईल वर्षाव

Jalgaon Crime News : शाळकरी मुलीचे व्हिडिओ व्हायरल करून ‘ब्लॅकमेलिंग’! दोन संशयितांना अटक; मोबाईल जप्त

'शंभूराज देसाईंचा पराभव हेच उद्धव ठाकरेंचं ध्येय'; पाटणमध्ये तिरंगी लढत शक्य? सत्यजित पाटणकर कोणती भूमिका घेणार?

'इंद्रायणी' मालिकेतील अभिनेत्याचा मोठा गौरव; इंदूच्या दत्तोबांची थेट राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी, पोस्ट शेअर करत म्हणाला-

SCROLL FOR NEXT