Stay informed with the latest weather updates in Maharashtra. Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather Updates: राज्यात 'ऑक्टोबर हीट' तर पुण्यात पाऊस, कंस असेल आजचं हवामान?

Maharashtra Weather And Rain Updates: पुण्यातील कमाल तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांत ३१ ते ३३ अंश सेल्सिअसच्या घरात आहे.

आशुतोष मसगौंडे

Maharashtra Weather: राज्यातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असतानाच सध्या 'ऑक्टोबर हीट'चा कडाका जाणवत आहे. दिवसभर रखरखते ऊन असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान उन्हाचा चटका जाणवत आहे. परंतु आता आणखी काही भागांतून नैऋत्य मोसमी वारे परतण्यास अनुकूल वातावरण झाल्याने आणि पावसाची शक्यता असल्याने 'ऑक्टोबर हीट'मुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हवेतील आर्द्रता आणि बदलते तापमान यांच्या प्रभावामुळे 'ऑक्टोबर हीट'चा कडाका जाणवू लागतो. पुण्यातील कमाल तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांत ३१ ते ३३ अंश सेल्सिअसच्या घरात आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

येत्या दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मोसमी पाऊस गुजरात, मध्य प्रदेशच्या उर्वरित भागांतूनही परतण्यास अनुकूल वातावरण आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी शनिवारी (ता.११) आणि रविवारी (ता. १२) पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मंगळवारी (ता. ८) मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. वाशीम, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारी (ता. ८) आणि बुधवारी (ता. ९), तर बुलडाणा जिल्ह्यात बुधवारी (ता. ९) मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

पुण्यातील अंदाज

पुणे आणि आसपासच्या परिसरात मंगळवारी (ता. ८) आणि बुधवारी (ता. ९) आकाश अंशतः ढगाळ राहून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. शनिवारपर्यंत (ता. १२) दुपारी आणि संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT