Transfer News esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra ZP Teacher Transfer: शिक्षकांची आता आंतरजिल्हा बदली होणार; बदली प्रक्रियेचा सहावा टप्पा सुरू

प्रशांत बैरागी

Maharashtra ZP Teacher Transfer : पती एका जिल्ह्यात, तर पत्नी दुसऱ्या जिल्ह्यात ज्ञानदानाचे कार्य करीत असले, तरी आठवड्याला शेकडो किलोमीटरचा प्रवास करून संसाराचा गाडा चालविण्याची तारेवरची कसरत हजारो प्राथमिक शिक्षकांना करावी लागत आहे. अशा हजारो शिक्षकांना ग्रामविकास, शालेय शिक्षण विभागाने बदलीच्या संधीची गुरुदक्षिणा दिली आहे.

राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सहावा टप्पा शासनाने सुरू केला. (Maharashtra ZP Teacher Transfer teachers will now be transferred inter district news)

शिक्षक बदली प्रक्रियेमुळे एकमेकांपासून दुरावलेल्या ‘दो हंसो का जोडा’ यांचे मिलन होणार आहे. ६ डिसेंबरपर्यंत बदलीपात्र शिक्षकांना ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. बदलीच्या ऑनलाईन पोर्टलवर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याचा शिक्षकांचा मार्ग मोकळा झाल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या विविध संवर्गांतील शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्यासाठी अथवा इच्छित जिल्ह्यात सेवा करण्यासाठी शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ इच्छितात, त्यादृष्टीने काही वर्षांपासून ऑनलाईन स्वरूपात ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयातर्फे ६ डिसेंबरपर्यंत शिक्षकांना स्वतःच्या लॉगीनवरून अर्ज सादर करता येतील.

शिक्षकांना संकेतस्थळावर अर्ज सादर करण्यासाठी स्वतंत्रपणे लॉगीन आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे.राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबत सुधारित धोरण ०७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आले आहे.

त्यानुसार ३० जून २०२३ ला बदलीस पात्र असतील, अशा शिक्षकांनाच अर्ज भरण्याची संधी देण्यात येईल. २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्यांनी अर्ज केले; परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रिया राबवत असताना जे पात्र असूनही रिक्त जागेअभावी बदली मिळाली नव्हती,

अशांना २०२२ मध्ये भरलेल्या अर्जात जिल्हा बदलण्यास एडिट करण्यास संधी देण्यात आली आहे. न्यायालयीन प्रकरणात व विभागीय आयुक्तांकडील अपील प्रकरणात बदल्यांबाबतचे स्पष्ट आदेश दिलेले असतील, त्या शिक्षकांनाही बदलीसाठी संधी देण्यात येईल. त्यासाठी संबंधित शिक्षकांनी सदर न्यायालयीन/ विभागीय आयुक्तांच्या आदेशाची प्रत अर्जाबरोबर पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे.

कार्यवाही जिल्हास्तरावरूनच

बदलीपात्र शिक्षकांसाठी रोष्टर (बिंदुनामावली) प्रसिद्ध करण्याची व अवलोकनाची कार्यवाही जिल्हास्तरावरून होईल. बदली हवी असलेल्या शिक्षकांना एका जिल्हा परिषदेतून दुसऱ्या जिल्हा परिषदेत जायचे आहे, त्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेची एकूण मान्य शिक्षकांच्या पदांपैकी १० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त असू नये, असेही सूचित केले आहे. बदलीसाठी इच्छुक शिक्षकांना सर्व माहिती अचूक भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT