B Team Of BJP:
लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासून राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यातील महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने या पक्षांशी चर्चा सुरू केली होती.
परंतू, जागावाटपावची चर्चा फिसकटल्याने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालील वंचित बहुजन आघाडीने एकला चलो चा नारा दिला आहे. पुढे आंबेडकर यांनी राज्यातील 22 जगांवर आपले उमेदवारही जाहीर केले आहेत.
आता आंबेडकरांच्या या भूमिकेवर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी हल्लाबोल करत वंचित बहुजन आघाडी भजपची बी टीम असल्याचा आरोप केला आहे.
साम टीव्हीशी बोलताना, तुषार गांधी म्हणाले महाराष्ट्रात तोडलेली शिवसेना आणि तोडलेल्या राष्ट्रवादीशी भाजपची जी युती झाली आहे, त्याला गद्दारांची युती म्हणायला पाहिजे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे भाजपला मात देण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्यांनाच मत द्यायला पाहिजे. मतदारांनी पूर्वी जी चूक केली ती आता करू नये. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान वाचवायची ही शेवटची संधी आहे.
महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम भाजपची बी टीम म्हणून काम करत आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करू नका, असेही तुषार गांधी म्हणाले.
तुषार गांधी यांच्याकडून महाराष्ट्रातील मतदारांना आवाहन करण्यासाठी प्रोग्रेसिव महाराष्ट्र मंच स्थापन करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून ते महायुतीला मतदान न करता महाविकास आघाडीला मतदान करा, असे आवाहन करणार आहेत. अनेक सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक चित्रपट कलावंत यांचा प्रोग्रेसिव महाराष्ट्रच्या भूमिकेला पाठिंबा आहे.
तुषार गांधी या मंचाच्या माध्यमातून सोशल मीडियासह राज्यभरात दौरे करत मतदारांच्या भेटी घेऊन भाजपला मतदान न करण्याचे आवाहन करणार आहेत. महायुती बरोबरच वंचित, एमआयएमला देखील मतदान करू नये असे आवाहन तुषार गांधी यांनी केले आहे.
तुषार गांधींच्या या आरोपावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्टपणे या आरोपांना नाकारले.
मोकळे म्हणाले, वंचित आणि शोषितांचे राजकारण उभे राहू नये यासाठी प्रस्थापती पक्ष आणि त्यांचे सहयोगी घटक सातत्याने प्रयत्न करत असतात हा भारताचा इतिहास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकारणालाही याच पद्धतीचा विरोध झाला. इतिहासामध्ये त्यांना इंग्रजांचे हस्तक ठरवण्याचे काम झाले आहे. आणि आता प्रकाश आंबेडकरांच्या बाबतही हाच प्रकार होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.