महाराष्ट्र बातम्या

पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर

पूजा विचारे

मुंबई:  महाविकास आघाडीतर्फे पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातून पाच अधिकृत उमेदवार निवडणूक लढवत असल्याचे संयुक्त जाहीर प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. 

अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेकडून श्रीकांत देशपांडे, पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अरुण लाड, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण, पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसकडून प्राध्यापक जयंत आसगांवकर तर नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे.

तरी या अधिकृत उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे सुभाष देसाई आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

भाजपकडूनही उमेदवार जाहीर

भाजपनं देखील काही दिवसांपूर्वीच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या चार उमेदवारांची घोषणा केली. भाजप केंद्रीय समितीकडून नावाची घोषणा करण्यात आली. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर, पुण्यातून संग्राम देशमुख, नागपुरातून संदीप जोशी  आणि अमरावतीतून नितीन धांडे यांना भाजपने तिकीट दिले आहे. मात्र  या यादीतून कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुणकर्णी त्यांचा पत्ता कट करण्यात आला. या उमेदवारीची घोषणा दिल्लीवरून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील चार, तर उत्तर प्रदेशातील नऊ जागांवर भाजपकडून उमेदवार घोषित करण्यात आलेत.

Mahavikas Aghadi announces Graduate and Teachers Legislative Council constituency list of five official candidates

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT