MVA Meeting  Esakal
महाराष्ट्र बातम्या

MVA Meeting : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटणार? आज होणार बैठक; एकमत न होणाऱ्या जागांवर चर्चा होणार

MVA Meeting : या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपांवर चर्चा होणार असून अद्यापही आघाडीमध्ये १५ जागांवर एकमत होऊ शकलेले नसल्याने त्यावर एकत्रित बसून मार्ग काढला जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: ‘इंडिया’ आघाडीतून आज पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेस आणि पंजाबमधून आपने बाहेर पडून लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढविण्याची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर आज (ता.२५) राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागा वाटपावर मुंबईत बैठक होणार आहे.

या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपांवर चर्चा होणार असून अद्यापही आघाडीमध्ये १५ जागांवर एकमत होऊ शकलेले नसल्याने त्यावर एकत्रित बसून मार्ग काढला जाणार आहे. तसेच जागा वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित केला जाणार आहे. पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये काँग्रेसचे स्थानिक पक्षांसोबत सूर जुळले नसले तरी राज्यात मात्र महाविकास आघाडीमध्ये तुर्तास सूर बिनसलेले नाहीत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरु असल्याने ‘इंडिया’ आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा पुढे जात नव्हती, आता मात्र आघाडीच्या जागा वाटप चर्चेला वेग येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या बैठकीला शिवसेनेचे (ठाकरे गट) खा. संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रित केले असल्याची माहिती माध्यमांसोबत बोलताना दिली. मात्र, वंचित बहुजन आघाडीला अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या नेत्यांची स्वाक्षरी असलेले कुठलेही पत्र अथवा निमंत्रण प्राप्त झालेले नाही. त्यामुळे उद्याच्या बैठकीला ‘बिन बुलाए मेहमान’ बनून आम्ही जाणार नाही, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने जाहीर केली आहे.

महाविकास आघाडीच्या या बैठकीला काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. तर ठाकरे गटाकडून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, खा. सुप्रिया सुळे आणि आ. जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षासोबत जागावाटपावरून काँग्रेससोबत एकमत झाले नसल्याने या दोन्ही पक्षांनी ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात मात्र ठाकरे गटाला मिळणाऱ्या सहानुभूतीचा कल पाहू काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या कलानेच घेण्याचा निर्णय घेतला आहे.

‘वंचित’, शेतकरी संघटनेचा समावेश होणार?

‘इंडिया’ आघाडीमध्ये काँग्रेसकडून जागा वाटपाच्या समितीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांचा समावेश आहे. गेहलोत यांनी चार दिवसांपूर्वी जागा वाटपाच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत ‘मातोश्री’ निवासस्थानी येऊन चर्चा केली. या चर्चेमध्ये ठाकरे गटाच्या २३ जागांच्या मागणीवर चर्चा झाल्याचे समजते. वंचित बहुजन आघाडी आणि शेतकरी संघटना या दोन्ही पक्षांचाही महाविकास आघाडीमध्ये समावेश केला जावा, असा ठाकरेंचा आग्रह आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: बेलापूर विधानसभा मतदारसंघात आढळली संशयास्पद गाडी

Maharashtra Vidhan Sabha Voting Percentage Update: सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान

Maharashtra Assembly Election 2024: वरळीत शिवसेनेच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा? व्हायरल पत्राने कार्यकर्त्यांमध्ये वातावरण तापलं! नेमकं काय घडलं?

UGC NET Exam December 2024: यूजीसीचं अधिसूचना जाहीर, जाणून घ्या परीक्षा वेळापत्रक

Maharashtra Assembly Election 2024 : Sachin Tendulkar आणि अजिंक्य रहाणेने बजावला मतदानाचा हक्क; कर्तव्य पुर्ण करण्याचे केले मतदारांना आवाहन

SCROLL FOR NEXT