Mahavitaran Strike News esakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Power Supply : तुम्हाला माहितीये मुंबईनगरीला कोण वीज पुरवठा करतं? मग, जाणून घ्या..

महाराष्ट्रात सुरू असलेल्या संपाचा मुंबईवर किती परिणाम झाला आहे जाणून घ्या..

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात सुरू असलेल्या संपाचा मुंबईवर किती परिणाम झाला आहे जाणून घ्या..

Mahavitaran Strike News : राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मिटल्यानंतर आता राज्यभरातील महावितरणचे कर्मचारी (Mahavitaran Strike News) संपावर आहेत, यामुळं शेतकरी व सामान्य ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात महावितरणनं संपाची हाक दिली आहे.

अदानी समूहाला (Adani Group) वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या जवळपास 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. 4, 5 व 6 जानेवारी 2023 असा तीन दिवस हा संप असणार आहे. गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसांनंतरही सुरु ठेऊ, अशी भूमिका महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतलीये.

मात्र, महाराष्ट्रात सुरू असलेल्या संपाचा मुंबईला (Mumbai) फारसा फटका बसलेला नाही. भारतात सरकारी आकडेवारीनुसार, एकूण 2 लाख 75 हजार मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होते. आणि वीज वापराची सरासरी काढली तर देशातल्या प्रत्येक घरात दर तासाला सरासरी एक हजार किलोवॅट इतकी विजेची मागणी आहे.

मुंबईनगरी विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण

महाराष्ट्राला लॉकडाऊनपूर्वीचा विचार केला तर सरासरी दिवसाला 22 हजार मेगावॅट इतक्या विजेची गरज लागते. यातली जवळपास 8 ते 12 टक्के म्हणजे 3300 मेगावॅट वीज ही एकट्या मुंबई शहराला लागते. मुंबईनगरी विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. मुंबईतल्या वीज निर्मिती आणि पुरवठा व्यवस्थेला 'आयलँडिंग व्यवस्था' असं म्हटलं जातं. मात्र, जशी विजेची मागणी वाढली, तशी टाटा पॉवर आणि पूर्वी रिलायन्स एनर्जी या कंपन्यांना वीज निर्मिती आणि पुरवठ्याचं कंत्राट देण्यात आलं.

मुंबईनगरीला कोण वीज पुरवठा करतं?

मुंबई औद्योगिक राजधानी असल्यामुळं इथली विजेची औद्योगिक मागणीही जास्त आहे. त्यासाठीच 1873 साली मुंबईत बाँबे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (Bombay Electric Supply & Transport) या नावानं एक कंपनी स्थापन करण्यात आली. मुंबईला अखंड विद्युत पुरवठा करणं आणि शहराअंतर्गत वाहतूक सेवा चालवणं हे तिचं मुख्य काम होतं. आताही शहरातील साडे दहा लाख घर आणि कार्यालयांना हीच कंपनी वीज पुरवठा करते. 1990 च्या दशकापासून मुंबई शहर आणि उपनगरांना वीज पुरवठा करण्यासाठी टाटा पॉवर (Tata Power), रिलायन्स या कंपन्यांशी करार करण्यात आले.

मध्य मुंबईत टाटा, अदानी पॉवरकडून होतो वीज पुरवठा

यातील रिलायन्स कंपनीनं (Reliance Company) आपला मुंबई शहराला करत असलेला वीज पुरवठा अलीकडंच 2018 मध्ये अदानी पॉवर या कंपनीला विकला आहे. दक्षिण मुंबईत बेस्ट, पश्चिम आणि मध्य मुंबईत टाटा तसंच अदानी पॉवर या कंपन्यांकडून पुरवठा होतो. टाटा पॉवर कंपनी एक हजार मेगावॅट वीज निर्मिती करते, तर अदानी एनर्जी ही कंपनी मुंबईजवळ डहाणू इथं पाचशे मेगावॅट इतकी वीजनिर्मिती करते, त्यामुळं मुंबईनगरीवर या संपाचा फारसा परिणाम झालेला दिसत नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT