Mahayuti esakal
महाराष्ट्र बातम्या

Mahayuti Leaders : महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध; आमदारांची नाराजी दूर करण्याचा शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रयत्न

लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी महाराष्ट्रात महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी महाराष्ट्रात महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. याबाबत तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे समजते. स्वपक्षातील आमदार व नेते मूळ पक्षात परतू नयेत यासाठी विस्तार आवश्यक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मत आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कुणालाही पक्षात परत घेणार नाही अशी जाहीर भूमिका घेतली असली तरीसुद्धा नीलेश लंके यांच्याप्रमाणे जिंकू शकणाऱ्या नेत्यांना ते परत घेतील या धास्तीने ‘दादा’ गटाला विस्तार हवा आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला त्यांचा स्ट्राईक रेट वाढावा यासाठी आमदारांना मंत्रिपदे द्यायची आहेत.

त्यामुळेच विस्तार आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे. भाजपलाही सोशल इंजिनिअरिंगचा समतोल साधण्यासाठी विस्तार आवश्यक वाटत असून दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी याबाबत चर्चा करण्याची गरज भाजप नेत्यांनी मान्य केली. कुणबी, मराठा तसेच ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देत प्रदेशनिहाय समतोल साधण्याची परवानगी प्रदेश भाजप दिल्लीकडे मागणार असल्याचे समजते.

शिंदे गटात उत्सुकांची रांग

एकनाथ शिंदे यांच्यासमवेत पक्षांतर करणारे अनेक आमदार शपथविधीची वाट पाहात आहेत. आशिष जयस्वाल (विदर्भ ) संजय शिरसाठ ( मराठवाडा ) भरत गोगावले ( कोकण ) यांचा दावा जुनाच आहे. महिला चेहरा म्हणून यामिनी जाधव किंवा लता सोनावणे यांचा विचार होऊ शकेल. संजय शिरसाठ यांनी पक्षप्रवक्ता या नात्याने विस्तार लवकरात लवकर होणे गरजेचे असल्याचे नमूद केले आहेच. विधानसभेला केवळ ३ महिने असताना आता कशाला विस्तार असे काहींचे म्हणणे असले तरी हा निर्णय पुढे ढकलण्याजोगा नाही असा सूरही अनेकांनी आळवला आहे.

देवेंद्र फडणवीस हवेतच

लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात समाधानकारक कामगिरी करता आली नाही पण तरीसुद्धा राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच नेतृत्व हवे यावर भाजपचे अनेक नेते ठाम आहेत. भाजपच्या आमदारांनी फडणवीस सरकारमध्ये हवेत असा ठराव केल्याचे काल झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षात आणून दिले. त्यावर मी पळणारा नाही असे सांगत फडणवीसांनी बरीच खाते सांभाळताना पक्ष कार्याकडे लक्ष देता येत नाही. अर्धा एक टक्क्याचा फरक कमी करून महायुतीला विजयी करण्यासाठी मला पूर्णवेळ कामात झोकून द्यायची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपचे ओबीसी मतांवर लक्ष

ओबीसी समाजाची मते मिळावीत यासाठी पंकजा मुंडे, संजय कुटे आणि पंकज भोयर या नावांचा विचार करावा असे काहींना वाटते. पश्चिम महाराष्ट्रातून माधुरी मिसाळ,जयकुमार गोरे आणि कोकणातून तरुण चेहरा म्हणून नीतेश राणे यांच्या नावांची चर्चा आहे.

मुंबईतून आशीष शेलार यांना मंत्रिमंडळात घेऊन मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी कुणाकडे सोपविता येईल? याबद्दल दिल्लीतून विचार होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात अनुक्रमे केंद्र आणि राज्य अशी वाटणी झाली असली तरीसुद्धा या परिसरातील एखादा नवा आदिवासी चेहरा मंत्री करावा का? यावर विचार सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT