INDIA Alliance Meeting esakal
महाराष्ट्र बातम्या

Video : ममतादीदी रुसून गेल्या; 'या' तीन मुद्द्यांवरुन स्पष्ट दिसतेय नाराजी; व्हिडीओ पाहा

संतोष कानडे

मुंबईः दोन दिवस चाललेली इंडिया आघाडीची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीमध्ये पाच समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. मात्र चार समित्यांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांची नावंच नाहीत. केवळ टीएमसीचा उल्लेख करुन नावाची जागा रिकामी सोडून देण्यात आलीय.

इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये १४ सदस्यांची एक समन्वय समिती गठीत करण्यात आलीय. त्या समितीमध्ये शरद पवार आणि संजय राऊत यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. यासोबतच आणखी चार कमिट्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. एकूण ५ समित्या आणि ७५ सदस्य नियुक्त करण्यात आलेले आहेत.

बैठकीनंतर सर्व नेत्यांची एकत्र पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला ममता बॅनर्जी यांची उपस्थिती नव्हती. नाराज होऊन त्या हॉटेलमधून निघून गेल्या, असं बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीसांनीही याबद्दल भाष्य केलंय.

आज नियुक्त झालेल्या समित्यांमध्ये पहिली समिती ही समन्वय आणि निवडणूक धोरण समिती आहे. त्यामध्ये सातव्या क्रमांकावर अभिषेक बॅनर्जी यांचा उल्लेख आहे. उर्वरित चार कमिट्यांमध्ये टीएमसीचा उल्लेख तर आहे मात्र नावं नमूद केलेली नाहीत. या दोन मुद्द्यांमुळे ममता बॅनर्जी नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

विशेष म्हणजे सुरुवातीला जेव्हा बातम्या आल्या तेव्हा १३ सदस्यांची समन्वय समिती असल्याचं पुढे आलेलं होतं. त्यानंतर ही समिती १४ सदस्यांची असल्याचं निष्पन्न झालं. म्हणजे अभिषेक बॅनर्जी यांचं नाव नव्याने समाविष्ट झालं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसरी समिती ही प्रचार समिती आहे. त्यामध्ये शेवटी केवळ टीएमसीचा उल्लेख असून नाव नमूद केलेलं नाही. तिसरी सोशल मीडिया समिती असून यातही शेवटी टीएमसीचा उल्लेख असून नाव नाहीये.

चौथी मीडिया कमिटी असून पाचवी संशोधन समिती आहे. त्यातही शेवटी फक्त टीएमसी पक्षाचा उल्लेख आहे. यावरुन ममता नराज असल्याचा एक तर्क लावला जातोय. शिवाय फडणवीसांनी त्यांच्या कथित नाराजीवर भाष्य केलंय.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधकांच्या बैठकीत ममता दीदी आल्या आहेत, त्यांना बसायला खुर्ची दिली नाही. त्यामुळं त्या रागानं निघून गेल्या. ममतांना शरद पवारांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या थांबल्या नाहीत, असं फडणवीस म्हणाले. या तीन मुद्द्यांवरुन ममता नाराज असल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT