मुंबई : पुण्यातील भोसरी जमीन (pune bhosari land scam) घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि याप्रकरणातील आरोपी त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (mandakini khadse) आज ईडी कार्यालयात (ED) हजर राहणार असल्याची मा़हिती सुत्रांकडून मिळत आहे.
पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांना हायकोर्टानं (Bombay High Court) मोठा दिलासा दिला होता. दरम्यान 17 ऑक्टोबर ते 7 डिसेंबरपर्यंत तपासयंत्रणेला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देत याकाळात आटवड्यातून दोनदा, दर मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी कार्यालयात हजेरी लावण्याचे मंदाकिनी खडसेंना निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यानच्या काळात मंदाकिनी खडसे यांना अटक झाल्यास त्यांची 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी दिले होते. भोसरी जमीन घोटाळ्यातील खटल्याला वारंवार गैरहजर राहिल्यानं पीएमएलए कोर्टाकडनं मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे, ज्याविरोधात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. यावेळी तपास यंत्रणाना सहकार्य करण्याच्या अटीवरच मंदाकिनी खडसे यांना जामीन देण्यात आला होता.
एकनाथ खडसेंनी मागून घेतली वेळ
याप्रकरणी मंदाकिनी खडसे यांचा याप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत सोमवारी पीएमएलए कोर्टानं त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी केला. या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देता यावं यासाठी तीन आठवड्यांची स्थगिती खडसेंच्यावतीनं मागण्यात आली. मात्र, कोर्टानं ही मागणी फेटाळून लावली होती. एकनाथ खडसेंना मात्र याप्रकरणी कोर्टानं वैद्यकीय कारणास्तव तूर्तास दिलासा दिला आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे एकनाख खडसे हे सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल असून तिथं त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं त्यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं. यापूर्वी एकनाथ खडसे यांना ही बोलवण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे कारण देत त्यांनी वेळ मागून घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.