Manipur Violence 
महाराष्ट्र बातम्या

Manipur Violence: शहांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; शरद पवार उपस्थित राहणार नाहीत, कारण...

Sandip Kapde

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी 24 जून रोजी नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यामध्ये सर्व पक्षांचे नेत्यांनी येण्याची अपेक्षा सरकारने केली आहे.

अमित शाह यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. पूर्वनियोजित बैठकीमुळे उपस्थित राहता येत नसल्याची शरद पवार यांनी सांगितले आहे.

24 जूनला पार पडणाऱ्या सर्व पक्षीय बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे जनरल सेक्रेटरी नरेंद्र वर्मा आणि मणिपूरचे प्रदेशाध्यक्ष सोरन सिंग उपस्थित राहणार आहेत.

मणिपूरमधील परिस्थितीबाबत काँग्रेस सातत्याने केंद्र सरकारला सवाल करत आहे. मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात 10 समविचारी पक्ष 10 जूनपासून पंतप्रधानांना भेटू इच्छितात. दुसरीकडे, सीपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी खासदार डी राजा म्हणाले होते की, मणिपूरचे मुख्यमंत्री अक्षम झाले आहेत. तिथल्या लोकांचा आत्मविश्वास उडाला आहे. (Manipur Violence News)

Sharad Pawar will be absent from the meeting called by Amit Shah

मणिपूरमध्ये 3 मेपासून संघर्ष -

मणिपूरमध्ये 3 मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळावा या मागणीला विरोध करण्यासाठी मणिपूरमध्ये 'आदिवासी एकता मोर्चा' काढण्यात आल्यानंतर हिंसक संघर्ष झाला. तेव्हापासून परिस्थिती सतत खालावत गेली. आतापर्यंत सुमारे 120 लोकांना आपला जीव गमवावा लागला असून 3,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

मणिपूरमधील परिस्थिती कशी आहे?-

मणिपूरमध्ये हिंसाचार इतका वाढला आहे की जमावाने केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आर के रंजन यांचे घर जाळले होते. शांतता प्रस्थापित करण्याचे अनेक प्रयत्न झाले पण परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही.

राज्यात केंद्रीय सशस्त्र दलाच्या 84 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, आसाम रायफल्सचे 10,000 हून अधिक जवानही तैनात आहेत, परंतु लष्करी फौजा रस्त्यावर उतरल्यानंतरही परिस्थिती बिकट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT