manoj jarange patil sakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange: "गोड बोलून काटा काढायाचा प्रयत्न"; उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप

Amit Ujagare (अमित उजागरे)

जालना : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आंतरवाली सराटी इथं उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून त्यांची प्रकृती देखील खालावली आहे. यापार्श्वभूमीवर जरांगे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. सरकारची सुरु असलेली चालढकल यावरुन गोड बोलून काटा काढायचा त्यांचा प्रयत्न दिसतोय, अशा शब्दांत जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारवर गंभीर आरोप केला. (Manoj Jarang who is on hunger strike again in Anrwali Sarati again attack on Maharashtra government)

जरांगे म्हणाले, सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीशी अद्याप माझा संवाद झालेला नाही. आता इकडं माझं आमरण उपोषण सुरु आहे. त्यामुळं सरकार बैठका घेऊन तोडगा काढू असं म्हणून मराठ्यांना लाडीगोडी लावत असतील. गोड बोलून काटा काढायचं काम करत असतील एखादे वेळेस असा अंदाजच दिसतोय मला. एकीकडून म्हणायचं आम्ही तातडीनं मार्ग कोढतो आणि इकडं आमरण उपोषण सुरु असलं तरी पाच पाच दिवस होऊ द्यायचे. यामुळं त्यांचा डाव देखील असू शकतो. त्यांना जर मराठ्यांची माया असती तर त्यांनी चार दिवस उगवूच दिले नसते.

छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर बोलताना म्हटलं होतं की, हे आरक्षण टिकणारं आहे, त्यामुळं मनोज जरांगेंनी विनाकारण वाद वाढवू नये. त्यावर जरांगे यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की, "तू आम्हाला सांगू नकोस आम्हाला कळतं" त्याचबरोबर भुजबळ म्हणाले होते की, मराठा आरक्षणामुळं आम्ही पडलो नाही आणि तसं समजुही नका. त्यावर जरांगे म्हणाले, "थोडं थांबा मराठे त्यांना दाखवतील काय आहे ते?"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT