Manoj Jarange  sakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : आरक्षणासाठी सत्तेचाच पर्याय ; मनोज जरांगे यांचे प्रतिपादन, शांतता संवाद फेरीसाठी दौरा

‘‘आरक्षणाच्याआडून आम्हाला राजकारण करायचे नाही. सत्ताधारी, विरोधक मला उघडे पाडण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. एक वर्षापासून लढा सुरू असूनही आरक्षण मिळत नसले तर सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही,’’

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

वडीगोद्री (जि.जालना) : ‘‘आरक्षणाच्याआडून आम्हाला राजकारण करायचे नाही. सत्ताधारी, विरोधक मला उघडे पाडण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. एक वर्षापासून लढा सुरू असूनही आरक्षण मिळत नसले तर सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही,’’ असे मत मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी व्यक्त केले.

जरांगे हे बुधवारपासून (ता.७) पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत. उद्या सोलापूरला शांतता संवाद फेरी असेल. त्यासाठी आज सायंकाळी ते अंतरवाली सराटीहून (ता. अंबड) तुळजापूरला रवाना झाले. ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत ठिकठिकाणी काढलेल्या शांतता फेऱ्यांना मोठा प्रतिसाद मिळा आहे. यापुढेही तो मिळेल. न्याय हक्कासाठी जनता आता घरात बसणार नाही.’’ भाजप मराठवाडास्तरीय मोहीम राबवणार आहे. त्यावर टीका करताना जरांगे म्हणाले, की भाजपचे ही मोहीम आरक्षण विरोधी आहे. आमदार निवडून आणण्यासाठी ते आहे. त्यांनी शेतकरी, गरीबांच्या कल्याणासाठी मोहीम राबवावी. त्यांचे सुरू झाले की आम्हीही मोहीम राबविणार आहोत’.

‘माझ्या बदनामीचा प्रयत्न’

काही मराठा आंदोलकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावर जरांगे यांनी म्हणाले की, ‘राज्यात सध्या आंदोलन सुरू नाही. ठाकरे यांना भेटण्यासाठी कोणताही निरोप आलेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोहीम राबविली जात आहे. मला घेरण्याचा, उघडे पाडण्याचा व बदनामी करण्‍याचा त्यातून प्रयत्न केले जात आहे. जनता हुशार आहे. हा डाव यशस्वी होणार नाही’.

उमेदवारीसाठी २० पर्यंत प्रस्ताव

अंतरवाली सराटी येथे १४ ते २० ऑगस्टदरम्यान विधानसभेची आगामी निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांचे प्रस्ताव मागविले जाणार आहेत. या प्रस्तावांवर २९ ऑगस्टला निर्णय घेण्यात येईल. या दिवशी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. निवडणुकीत उमेदवार द्यायचे किंवा कसे याचा निर्णय त्यावेळी घेतला जाईल, असे जरांगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT