Manoj Jarange Health Esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Health: सरकारच्या आवाहनाला जरांगेंचा प्रतिसाद नाही, आता थेट हायकोर्टानंच विचारलं; औषधोपचारांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

Manoj Jarange Health: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा (गुरुवारी) सहावा दिवस आहे. काल (बुधवारी) उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याचे दिसून आले.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा (गुरुवारी) सहावा दिवस आहे. काल (बुधवारी) उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याचे दिसून आले. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी जरांगे हे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या त्यांच्या मूळ गावी बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

‘मी वैद्यकीय उपचार घेणार नाही. मला झोपेत सलाईन लावू नका. सलाईन लावायचे असेल तर अगोदर अंमलबजावणी कधी करता ते सांगा. मायबाप समाज तुम्ही सरकारला धारेवर धरा. मी एकटा मुंबईत जाऊन बसेन. अंमलबजावणी झाल्याशिवाय उठणार नाही. सरकारने त्वरित निर्णय घ्यावा. अंत पाहू नका. मी जर मेलो तर मला तसेच शासनाच्या दारात नेऊन टाका,’’ असे मनोज जरांगे यांनी बुधवारी (ता. १४) अंतरवाली सराटी येथे उपस्थित मोठ्या जनसमुदायाला सांगितले. यावेळी जरांगे यांनी त्यांना लावलेली सलाईन काढून फेकून दिली.

राजपत्रित अध्यादेश व मसुदा यांची अंमलबजावणी करावी, अधिवेशन घेऊन ‘सगेसोयऱ्या’बाबत कायदा मंजूर करावा, यासाठी शनिवारपासून (ता.१०) मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण करत आहेत.

जरंगे यांची परवानगी नसताना त्यांच्यावर IV उपचार करण्यात आले त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि काळजीची गरज असेल तर सरकारने मराठा आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी अन्यथा पुढील आंदोलनासाठी मुंबईला जाण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

मराठा कार्यकर्ते किशोर मरकड यांनी माहिती देताना सांगितले की, जरांगे डिहायड्रेट झाले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी वैद्यकीय मदत घेण्याचा निर्णय घेतला. याआधी जरांगे यांनी आपल्या मागण्या मान्य न केल्यास महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींची रॅली होऊ देणार नाही, असा इशारा आंदोलनस्थळावरून दिला होता.

दरम्यान मनोज जरांगे यांना उच्च न्यायालयाने औषध उपचाराच्या संदर्भात विचारणा केली आहे. जरांगे उपचार घेणार की नाही, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्या उपोषणाच्या संदर्भात एक याचिका दाखल केली आहे. त्यावरून न्यायालयाने जरांगे यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT