Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : ''लोकसभा निकालात जरांगेंचा इम्पॅक्ट नाही'', ओबीसींसाठी उपोषणाला बसलेल्या हाकेंचा हल्लाबोल

संतोष कानडे

Laxman Hake on Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र जालन्यातच आंदोलनाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर कडक शब्दांमध्ये टीका केली आहे.

आंतरवाली सराटी येथे सहा दिवस उपसोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी मंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत आपले उपोषण मागे घेतले आहे. ३० जूनपर्यंत सरकारला वेळ देवून सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीचा शब्द त्यांनी सरकारकडून घेतला.

दुसरीकडे जालन्यातल्या वडीगोद्री येथे ओबीसींच्या हक्कांसाठी लक्ष्मण हाके यांनी आंदोलन पुकारलं आहे. शुक्रवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगेंच्या इफेक्ट आजिबात दिसला नाही, असं म्हणत जरांगेंना संविधानाबद्दल काहीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात जरांगेंच्या इफेक्ट चालला, असं म्हणता येणार नाही. तसं असतं तर मंगेश साबळेंना दीड लाख मतं पडली नसती. साबळेंना मतदान करु नका, असंआवाहन जरांगेंनी केलं होतं, असंही हाके म्हणाले.

हाके पुढे म्हणाले की, मनोज जरांगेंनी लोकसभा निवडणुकीचं श्रेय घेऊ नये. जरांगे हे तत्त्वज्ञानी नाहीत, विचारवंत नाहीत की सोशल वर्कर नाहीत, त्यांचं कुठेच योगदान नाही. या सुमार माणसाला संविधानाबद्दल अभ्यास नाही, त्यांचं आंदोलन हे राजकीय भावनेने होतं, असंही हाके म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'या' शिल्पकाराने घडवलाय राहुल गांधींनी अनावरण केलेला कोल्हापुरातील शिवरायांचा पुतळा; जाणून घ्या रायगड कनेक्शन

ती कुठेय? सगळे आले पण ती नाही दिसली, बिग बॉस मराठीचा प्रोमो पाहून नेटकरी करतायत तिची चौकशी

Bigg Boss Marathi 5 : सूरज की निक्की कोण आहे व्होटिंग ट्रेंड्समध्ये आघाडीवर ? घ्या जाणून या सीजनचे फायनल वोटिंग ट्रेंड्स

Used Car Buying Tips: सणासुदीत रिसेल कार खरेदी करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, होणार नाही फसवणूक

Latest Marathi News Live Updates : वीज दरवाढीचा व्यावसायिकांना ‘शॉक’; प्रतियुनिट 2 रुपये कमी करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT