महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : सरसकट आरक्षण देण्यासाठी विखे पाटलांनी शब्द दिला! उद्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक

संतोष कानडे

मुंबईः राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासंदर्भात मंगळवारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. जरांगे यांच्या उपोषणाचा सोमवारचा सहावा दिवस आहे. द्यायचं असेल तर सरसकट मराठा आरक्षण द्यावं, केवळ मराठवाड्यातील मराठ्यांना नाही, अशी भूमिका जरांगेंनी स्पष्ट केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, काही वेळापूर्वी मला राधाकृष्ण विखे पाटलांचा फोन आलेला होता. त्यांनी सांगितलं की, मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची उद्या बैठक बोलावतो. परंतु मी म्हटलं सरसकट द्यावं लागेल. त्यामुळे त्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याचं सांगितलं.

जरांगे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातल्या एका भावाला न्याय आणि दुसऱ्या भावावर अन्याय; हे जमणार नाही. सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर १ नोव्हेंबर रोजी आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरु होईल. तेव्हा हे आंदोलन सरकारला झेपणार नाही.

माजलगाव विधानसभेचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सोळंके काहीतरी बोलले, त्यानंतर त्यांच्या घरावर हल्ला झाला. आमच्या आंदोलनाला कुणीतरी गालबोल लावत आहे. पोलिसांनी मराठा समाजाच्या पोरांना त्रास दिला तर मी पुढे येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT