Maratha reservation news in marathi  
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मी असेन माहित नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं; मनोज जरांगेंचे डोळे पाणावले

आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे मराठा समाज आज मुंबईच्या दिशेने कुच करणार आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेट संपला आहे. ठरलेल्या निर्णयानुसार ते आणि मराठा समाज आज (20 जानेवारी) मुंबईकडे कूच करणार आहेत.

Sandip Kapde

Maratha reservation news in marathi

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकार मराठ्यांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे मराठा समाज आज मुंबईच्या दिशेने कुच करणार आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेट संपला आहे.  ठरलेल्या निर्णयानुसार ते आणि मराठा समाज आज  (20 जानेवारी) मुंबईकडे कूच करणार आहेत.

दरम्यान आज सकाळी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. २६ जानेवारीपासून मनोज जरांगे मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत. आमचे पोरं जर मोठे करायचे असतील तर आज मुंबईला जाण्यापासून पर्याय नाही. आरक्षण मुंबईतच आहेत. यावेळी मनोज जरांगे यांच्या डोळ्यात अश्रू आले.  मी असेन माहित नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळालं हवं, असे मनोज जरांगे म्हणाले.

जरांगे म्हणाले, मराठा समाजातील पोरांच्या पाठिमागे ठामपणे उभे राहा, हे पोरं मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मायबाप मराठ्यांना विनंती आहे. ९ वाजता सर्व पोरं मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. २६ तारखेला मुंबईला राज्यातील सर्व मराठ्यांनी मुंबईत यावं. माझ शरीर मला साथ देत नाही. मी असेन किंवा नसेन पण मला माहित नाही पण समाजाची एकजूट फुटू देऊ नका.

सरकारला ७ महिने वेळ दिला आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही दोन ते तीन खिंडा लढवणार आहेत. मुंबईत मराठ्यांचा कोटींचा आकडा दिसेल. शेवटची लढाई आहे. त्यामुळे सर्व मराठ्यांनी घराबाहेर पडा. छातीवर गोळ्या पडल्या तरी मी आता मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. (Maratha reservation news in marathi)

अंतरवाली सराटीतूनच मी उपोषण करत निघणार आहे. सरकार मराठ्यांना वेठीस धरत असलेत तर आम्ही देखील आता मागे हटणार आहे. मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तरी सरकार आरक्षण देत नसेल तर लढावं लागेल. एकनाथ शिंदे यांच्यासोबच चर्चेत काही नाही. चर्चा होते पण आरक्षण मिळत नाही.  सर्वांनी शांततेत आंदोलन करावे, कोणी उद्रेक,जाळपोळ केली तर पोलिसांच्या स्वाधीन करा, असे मनोज जरांगे म्हणाले.

करोडोच्या संख्येने मराठा समाज एकत्र आला आहे. ३०० पेक्षा जास्त बळी गेले. आई-बहिणीच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं. सरकार एवढं निर्दयी कसं असू शकतं. ज्या मराठ्यांनी गादीवर बसवलं. त्यांनाच नोदीं असूनही आरक्षण मिळत नाही. हा अन्यायाचा कळस झाला. आपल्या परोरांच्या नरड्यावर पाय देण्याचं सरकारने ठरवलं असेल तर यांच्या राजकीय करीअरचा सुपडा साफ करु, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाल्या, सरकारला तर झोप यायला नको. मात्र सरकार निर्दयी आहे. मी आता असेल नसेल पण मराठ्यांनी एकत्र राहावं. छातीवर गोळ्या पडल्या तरी मागे हटणार नाही. मराठ्यांची पोरं मोठे झालेली बघायची आहेत. आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही. आरक्षण असून सुद्धा आपले पोरं संपले पाहीजेत, असा घाट रचण्यात आला आहे. उपोषणामुळे शरीर आता साथ देत नाही. पण तुम्ही विचार मरु देऊ नका. आता आरक्षण देऊन पोरांच्या डोक्यावर गुलाल टाकायचं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT