महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange: ''महाराष्ट्रात जातीयवाद कुणी पसरवला? मी? मग 'माधव पॅटर्न' कुणी राबवला?'' मनोज जरांगेंचा थेट हल्ला

संतोष कानडे

Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सहाव्यांदा उपोषण सुरु केलं होतं. परंतु त्यांची प्रकृती खालावत असल्याने समाजाने त्यांना उपोषण मागे घेण्याची विनवणी केली होती. शेवटी बुधवारी नवव्या दिवशी जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे.

राज्यामध्ये वाढलेल्या जातीयवादाला मनोज जरांगे जबाबदार आहेत, अशी विधानं सातत्याने होत आहे. त्या टीकेला जरांगेंनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, मला जातीयवादी म्हणता.. राज्यामध्ये आजच जातीयवाद झाला का? पन्नास वर्षांपूर्वी जातीयवाद नव्हता का? शंभर वर्षांपूर्वी राज्यात जातीयवाद नव्हता का?

जरांगे पुढे म्हणाले, यापूर्वी राज्यात जातीयवाद नव्हता तर 'माधव'चा प्रयोग काय होता? राज्यात 'माधव' पॅटर्न कुणी आणला. आपापल्या जातीचे लोक एकत्र करुन कुणी राजकारण केलं? मी माझ्या जातीसाठी उभा राहिलो तर त्याला तुम्ही जातीयवादी म्हणता? असं म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काय होता 'माधव' पॅटर्न?

शेठजी-भटजींचा पक्ष म्हणून राज्यात भाजपची ओळख होती. परंतु ओबीसी समाजातून पुढे आलेले आणि जनसामान्यांत मजबूत पकड असलेले दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी खऱ्या अर्थाने माधव प्रयोग राबवला.

माधव म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी या जातींना जवळ करणे, हा त्यामागचा उद्देश होता. भाजपने राज्यात सोशल इंजिनिअरिंग करत महादेव जानकर यांच्यासह अनेक छोट्या-मोठ्या नेत्यांना जवळ केलं आणि त्यांच्यासोबत निवडणूक लढवली. आज भाजप जो तळागाळात पोहोचला आहे, त्याचं श्रेय 'माधव' प्रयोगाला जातं.

जरांगेंची फडणवीसांवर टीका

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन मनोज जरांगे म्हणाले की, फडणवीस साहेब मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा. मुख्यमंत्री आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी फडणवीसांच्या जाळ्यात अडकू नये.. तुम्हाला संधी आहे, आमचं ओबीसीमधलं आरक्षण आमचं आम्हाला द्या. आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर मराठ्यांनी खचून जायची गरज नाही. सरकारने आपल्या लेकरांशी धोका केला तर तुम्ही तुमच्या मुलाशी धोका करु नका.. या सरकारला धडा शिकवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai School Holiday: मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर! शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

मुंबईत मुसळधार! लोकलसेवेवर मोठा परिणाम, ट्रेन तब्बल ३० ते ४५ मिनिटे उशीराने, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

Politics: लाडकी बहीण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य, भाजप आमदारामुळे महायुतीचं सरकार अडचणीत?

Rain Update: पालघर आणि नाशिकसाठी रेड अलर्ट, तर मुंबईसह पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी, वाचा 26 सप्टेंबरला कशी असेल पावसाची स्थिती?

Pune Baner Road Traffic Jam: पुण्यातील बाणेर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी! कामावरुन घराकडं निघालेले पुणेकर वैतागले

SCROLL FOR NEXT