Manoj Jarange  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange: इतर ठिकाणी समानता चालते मग आरक्षणात का नको? जरांगेंचा सवाल

सरकारनं प्रयोग करण्याच्या भानगडीत पडू नये असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

सेलू : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आता दोन दिवसांत संपणार आहे. यापार्श्वभूमीवर परभणीच्या सेलू इथं त्यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी जरांगेंनी सरकारकडं केवळ दोनच दिवस शिल्लक असल्याचा इशारा दिला आहे.

तसेच इतर ठिकाणी समानता चालते मग आरक्षणताच का नाही? असा सवाल विचारत. मराठ्यांनी आता ८० टक्के लढाई जिंकली असून अशी संधी पुन्हा येणार नाही, असं आवाहन उपस्थित जनसमुदयाला केलं. (Manoj Jarange Parbhani Selu Maratha Reservation rally says Equality wants in other section why not in reservation)

समानता कोणाला शिकवता?

जरांगे म्हणाले, "तुम्ही समानता समानता कोणाला शिकवता? तुम्हाला बाकीकडं समानता पाहिजे मग आरक्षणात का नको? मराठे जर ओबीसी आरक्षणात आहेत तर तुम्हाला घ्यावचं लागतं. मराठ्यांनो तुम्हाला जाहीर सांगतो देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. मराठ्यांनी फक्त सावध राहा, एकजूट फुटू देऊ नका"

प्रयोग करायच्या भानगडीत पडू नका

तुमच्या नोटिशीला घाबरुन ही लाट आता मागे फिरणार नाही. सरकारनं भानावर यावं, आम्ही धमक्या देत नसतो करुन दाखवत असतो. एकदा तुम्ही प्रयोग केला पुन्हा प्रयोग करायच्या भानगडीत पडू नका. आंतरवाली सराटीत शांततेत आंदोलन सुरु असताना सरकारनं भीषण हल्ला केला. नोटीसा देऊन पुन्हा प्रयोग करण्याचा प्रयत्न करु नका तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं मुश्कील होईल, अशा इशाराही त्यांनी दिला आहे. (Marathi Tajya Batmya)

मागासवर्ग आयोगानं मराठ्यांना १२-१३ टक्क्यांनी मागास सिद्ध केलं

ओबीसी प्रवर्गात जर यायचं असेल त्याची जात मागास सिद्ध असायला लागते तरच येता येतं नाहीतर नाही. तसेच ओबीसी असल्याच्या शासकीय नोंदी असाव्या लागतात तरंच ओबीसी प्रवर्गात येता येतं नाहीतर येता येत नाही. (Latest Marathi News)

मराठ्यांनी दोन्ही निकष पूर्ण केले मागासवर्ग आयोगानं मराठ्यांना १२-१३ टक्के मागास सिद्ध केलं तरी मराठ्यांना आरक्षण नाही. मराठ्यांना शासकीय नोंदी सापडल्या तरी मराठ्यांना आरक्षण नाही. मग आमची काय चूक? आमच्या मुलांच्या हितासाठी आम्ही कुठल्याही टोकाला जाऊ शकतो. मराठ्यांनी ठरवलं तर आयुष्यभर तुम्हाला गुलाल लागू देणार नाही.

भुजबळ काहीही करु शकत नाहीत

छगन भुजबळ तुम्हाला काही करु शकत नाही तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका मी खंबीर आहे. मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळानं मला सांगितलं की भुजबळांना आम्ही समजावलं आहे. पण तो का आरक्षणाच्या विरोधात बोलला तर त्याला वाजवलाच मग आम्ही केस आणि नोटीस यांना घाबरत नसतोय. (Latest Maharashtra News)

मराठा आरक्षणाचा कायदा करायला अडचण काय?

समितीचा पहिला आणि दुसरा अहवालही सरकारनं स्विकारला आहे. मग तुम्हाला मराठा आरक्षणाचा कायदा पारीत करायला अडचण काय आहे? याच नोंदी जर ७० वर्षांपूर्वी दिल्या असत्यातर आज मराठा ही जात जगाच्या पाठीवर प्रगत म्हणून नंबर एकला राहिली असती. (What is the difficulty in passing the Maratha reservation law?)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT