Manoj Jarange Patil Hunger Strike Esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Patil: बोगस कागदपत्रे काढून IAS बनता अन्... मनोज जरांगेंनी पोलीस भरतीवर केले पुराव्यासकट मोठे आरोप

आशुतोष मसगौंडे

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर मागण्यासांठी आज अंतरवाली सराटीत पुन्हा अमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. मराठा समाजाला दगा दिल्याने पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान उपोषणाला सुरूवात करण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलिसांवर मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले की, "पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीवेळी पोलिसांनी मराठा विद्यांर्थ्यांवर खुल्या प्रवर्गातून सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केली आहे."

ते पुढे म्हणाले की, "जे लोक बोगस कागदपत्रे सादर करतात त्यांना तुम्ही आयएएस करत आहात आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकडे खरी कागदपत्रे असताना अन्यात सुरू आहे."

पोलीस भरती प्रक्रियेवर आरोप

आपल्या उपोषणाला सुरूवात करण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार होत असल्याचे आणि मराठा उमेदवारांवर अन्याय केला जात असल्याचे पुरावे दाखवत आरोप केले. यावेळी जरांगे म्हणाले, "सगळी कागदपत्रे असताना पोलिसांनी मराठा समाजाच्या उमेदवारांकडून खुल्या प्रवर्गातून चाचणी देणार असल्याची संमतीपत्र जबरदस्ती लिहून घेतली आहेत. काही जातीयवादी पोलीस अधिकाऱ्यांकडून हे प्रकार सुरू आहेत. काही लोक बोगस कागदपत्रे सादर करत आएएएस बनत आहेत मात्र, आमच्याकडे खरी कागदपत्रे असूनही अन्याय होत आहे."

यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारने मराठा समाजाला दगा दिला असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, "सरकारने मराठा समाजाला धोका दिल्यामुळे पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात. सरकारला मागण्या माहीत आहेत, त्याच त्या मागण्या पुन्हा सांगण्याची गरज नाही."

यावेळी जरांगे पाटील यांनी नोकर भरती, विद्यार्थ्यांचे प्रवेश, मुलींच्या मोफत शिक्षणाचा प्रश्न यासह विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करत सरकारने ते लवकरात लवकर पूर्ण करावे असे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT