Manoj Jarange Patil  sakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Patil : जरांगेंना 'देवेंद्र द्वेष' नावाचा आजार झालाय, भाजप नेत्याने केला आरोप; पहा Video

Maratha Reservation: द्वेषाचे राजकारण मनोज जरांगे पाटील यांनी सोडून चर्चेला यावे

सकाळ वृत्तसेवा

BJp Vs Jarange Patil: मराठा आरक्षण देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीचे द्वेषाचे राजकारण मनोज जरांगे पाटील यांनी सोडून चर्चेला यावे, असे आवाहन भाजपचे राज्य उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे.

मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील ज्या पद्धतीने फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत ते पाहता त्यांना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाल्याचे दिसून येत आहे. जरांगे यांनी भाजपचे जेष्ठ नेते प्रवीण दरेकर यांना अंतरवल्ली येथे येण्याचे आव्हान दिले आहे. ते स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत. मात्र तुम्ही चर्चेला तयार आहात का, असा प्रश्नही लाड यांनी विचारला आहे.

मराठा तरुणांचा विकास व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शैक्षणिक बदल केले. नोकऱ्यांमध्येही मराठा आरक्षण ठेवले, मराठा समाजासाठी योजना आणल्या. मराठा समाजासाठी पोलीस भरती, परदेशी शिक्षण, व्यवसाय यासाठी प्रयत्न केले. तरीही जरांगे पाटील कोणाच्या छत्रीखालून फडणवीस यांचा द्वेष करतात ते पाहिले पाहिजे. असा द्वेष योग्य नाही.

विशिष्ट व्यक्तींना टार्गेट करून राजकारण करत असाल तर तुम्ही उघडपणे राजकारणात या. अन्यथा समाजासाठी काहीतरी करत असाल तर चर्चेतून मार्ग काढा. चर्चेला आम्ही तयार आहोत, पण द्वेषाचे राजकारण करू नका, असेही लाड यांनी बजावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT