Manoj Jarange Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Patil: पोलिसांनी अडविले वाहन पण मराठा आरक्षणासाठी दिव्यांग बांधव तीन किलोमीटर चालले

सकाळ वृत्तसेवा

Hadko News: रॅलीसाठी येणाऱ्या समाजबांधवांचे वाहन टीव्ही सेंटर परिसरात पोलिसांनी अडविले. या वाहनात दोन दिव्यांग होते. पायांनी अधू असलेल्या या दिव्यांगांनी पोलिसांचा मान राखत वाहन पुढे नेले नाही. पण, रॅलीत सहभागी होणारच, हा निश्चय करून तीन किलोमीटरची पायपीट केली.

दुपारी बाराच्या सुमारास रिधोरा देवी (ता. फुलंब्री) येथील दिव्यांग अमोल कोलते आणि त्यांचा एक दिव्यांग मित्र यांचे वाहन टीव्ही सेंटर परिसरातच पोलिसांनी अडविले.

त्यांनी त्या भागात मोकळ्या जागेत वाहन लावले. त्यानंतर पायांनी अधू असलेल्या या दोघांनी टीव्ही सेंटर ते सिडको बसस्थानक असा तीन किलोमीटरचा पायी प्रवास केला. याचा त्यांना मोठा त्रास झाला. नंतर या दोघांनी सायंकाळी रॅलीत सहभाग घेतला.

पोलिसांना केली विनंती

दिव्यांग असलेल्या कोलते आणि त्यांच्या मित्राला पायपीट करावी. हा त्रास इतरांना होऊ नये, यासाठी संदीप बोरसे, किशोर बलांडे, बाळासाहेब थोरात, पुंडलिक जंगले, वरुण पाथ्रीकर, नंदू मोटे, रमेश गायकवाड आदींनी पोलिसांना वाहने सिडको बसस्थानकापर्यंत जाऊ देण्याची विनंती केली.

शिवाय त्या ठिकाणी वाहनतळावर वाहन उभे केले जाईल, अशी हमी दिली. त्यावर पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT