मुंबई- मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी कोर्टात सुनावणी झाली. मनोज जरांगे यांना उपचार घेण्यास अडचण काय आहे? सलाईल लावणे म्हणजे उपचार नव्हेत. त्यांनी उपचार घ्यावेत अशी सूचना मुंबई हायकोर्टाने दिल्या आहेत. (Manoj Jarange Patil should get treatment said Bombay High Court maratha reservation )
मनोज जरांगेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की, जरांगेच्या उपचारासाठी दोन डॉक्टर तिथे आहेत. बुधवारी जरांगेंनी दोन सलाईनच्या माध्यमातून फ्लुईड घेतले. यावर हायकोर्टाने म्हटलं की, डॉक्टर त्याठिकाणी असणे म्हणजे उपचार घेणे असा होत नाही. त्यांना औषधोपचार घ्यायला सांगा. मात्र रक्ततपासणी ही त्यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही.
जरांगे डॉक्टरांच्या उपचाराला सहकार्य करत नाहीत. फ्लुईड व्यतिरीक्त ते कुठलेही औषधोपचार घेत नाहीत, अशी बाजू महाधिवक्तांनी कोर्टात मांडली. दुसरीकडे, अॅडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेच्या आदोलनाचा परिणाम म्हणून बुधवारी अनेक ठिकाणी बसेसची तोडफोड झाल्याचे कोर्टात सांगितलं. तसेच तोडफोडीचे फोटो त्यांच्याकडून कोर्टात सादर करण्यात आले.
तुम्ही भारताचे नागरीक आहात म्हणून राज्य सरकार तुमची काळजी घेतीये, त्याला तुमचा विरोध का, अशी विचारणा कोर्टाने मनोज जरांगे यांना केलीये. जे काही औषधोपचार यांची गरज आहे ते आम्ही घेत आहोत. डॉक्टर तिथे आहेत. पण कधी कधी ते (जरांगे) बोलण्याच्या मनस्थितीत नसतात, असं जरांगेच्या वकिलांनी कोर्टात स्पष्ट केलं.
मनोज जरांगे पाटील हे १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांनी अन्न-पाणी सोडलं आहे. उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे. त्यांची प्रकृती बिघडली आहे. याप्रकरणी सरकार २० फेब्रुवारीला एक दिवसाचं विशेष अधिवेशन घेतले जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर यादिवशी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.