महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Video : जरांगेंनी लावला ट्रॅप! आचारसंहिता लागताच टाकणार मोठा डाव; मुलाखतीत गौप्यस्फोट

संतोष कानडे

Maratha Reservation: विधानसभेच्या निवडणुका कुठल्याही क्षणी लागू शकतात. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटलेला नाही. लोकसभा निवडणुकीत ज्या मुद्द्यामुळे भाजपला फटका बसल्याचं जाणकार सांगत होते, त्याच मराठा आरक्षणामुळे विधानसभेत भाजपला धक्का बसू शकतो. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी एक ट्रॅप लावल्याचं दिसून येतंय. 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत पुसटसं भाष्य केलं आहे.

विधानसभेच्या निवडणुका, मराठा आरक्षण आणि दसरा मेळावा यावरील प्रश्नावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, दसरा मेळावा हा परंपरेचा मेळावा आहे. जातीचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. त्यासाठी आमची स्वतंत्र बैठक होईल. दसरा मेळाव्यामध्ये मी सामाजिक तत्त्वाचे मुद्दे मांडणार आहे.

''फक्त आचारसंहिता लागू द्या''

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, यांना आता आचारसंहिता लावूच द्या.. आता ठेवतच नाही.. पाडतोच सगळ्यांना. आमच्या डोळ्यादेखता तुम्ही आमचा अनादर केला, आम्हाला हिणवलं आहे. दुसऱ्या समाजाला दिलं आहे.. भरदुपारी आमच्या डोळ्यात चटणी टाकून दरोडा टाकत आहात. हे सगळं सत्तेच्या मस्तीवर सुरुय. पण आता मी ह्यांची सत्ताच ठेवत नाही. मी एकदा बोललो तर मग मागे सरकत नसतो.. मीही मग समाजासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो.

लढणार की पाडणार?

उमेदवार उभे करण्यासाठी झालेल्या बैठका, चर्चा आणि आलेले बायोडेटा यावर उत्तर देतना जरांगे पाटील म्हणाले, त्या प्लॅनबद्दल आत्ताच बोलणार नाही. पाडायचं फिक्स आहे. निर्णय घेताना पाडायचापण घ्यायचाच आहे आणि समाजाला विचारुन आपली लोकं उभी करायीच आहेत.

''आम्हाला समाजाचे लोकं सत्तेत पाठवायची आहेत. निवडणुका लढवण्याबद्दल लवकरच भूमिका जाहीर करणार आहे.. एकदा आचारसंहिता लागू द्या. सत्तेतल्या लोकांनी दिलेली खुन्नस मराठ्यांसाठी आणि सरकारसाठी चांगली नाही. त्यांचं म्हणणंय, कितीही लढा, किती उपोषणं करा, मराठ्यांना मोजत नाही, तुमच्या डोळ्यादेखता आरक्षण दिलं, करा काय करायरचं ते.. अशी खुन्नस आम्हाला सत्ताधाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांचा मी बिमोड करणार आहे. एकदा ह्या पठ्ठ्याने ठरवलं ना या राज्यात कुणाचीच सत्तेत यायची टप्पर नाही.'' असं म्हणत जरांगेंनी थेट इशारा दिला आहे.

यापूर्वी मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे न करता पाडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता जरांगे यांचं हे नवीन विधान आहे. तसं झालं तर सरकार कोंडीत सापडेल. जिथे उमेदवार तिथे लढणार आणि जिथे गरज तिथे पाडणार; अशी भूमिका आचारसंहितेनंतर मनोज जरांगे पाटील घेऊ शकतात, असंच त्यांच्या विधानावरुन दिसून येतंय.

#electionwithsakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: परतीच्या पावसानं पुण्याला झोडपलं! दसऱ्याच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची त्रेधातिरपट

Sayaji Shinde: अभिनेता ते नेता! सयाजी शिंदेंचा दरारा आता राजकारणातही; राष्ट्रवादीत झाला दणक्यात प्रवेश

Prathamesh Parab : लेक एवढा मोठा स्टार असून प्रथमेशचे वडील अजूनही करतात हे काम ; "घरची परिस्थिती हलाखीची तरीही..."

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणीचा अर्ज मिस झाला? हरकत नाही, मुदत आणखी वाढलीए! जाणून घ्या नवी तारीख

Santosh Juvekar: भूमिकेसाठी काय पण! संतोष जुवेकरचा ‘रानटी’ चित्रपटातील खतरनाक अंदाज; लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT