Mantralay  sakal
महाराष्ट्र बातम्या

Mantralay News : मंत्रालयात रोज ऐकवले जाणार शिवरायांचे विचार! या मंत्र्याने सुरू केला उपक्रम

सकाळ डिजिटल टीम

Mantralay News : आता रोज महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ऐकवले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ऐकल्यानंतरच मंत्रालयातील कामकाजाची सुरुवात केली जाणार आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेतून राज्य शासनाने हा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्त हा उपक्रम वर्षभर मंत्रालयामध्ये राबवला जाणार आहे. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना शिवाजी महाराजांचे विचार ऐकवले जाणार असून त्यानंतरच मंत्रालयातील कामाला सुरुवात होणार आहे.

कामकाजाच्या दिवशी सकाळी दहा वाजून 45 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना ऐकवले जाणार आहेत. यातून या सर्वांना प्रेरणा मिळेल असे या मागचे उद्दिष्ट आहे. रोज सकाळी दोन ते तीन मिनिटांसाठी शिवाजी महाराजांचे विचार या सर्वांना ऐकवले जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddiqui Case: हरियाणाच्या कतार तुरुंगात कट रचला, नंतर मुंबईत आले अन् घडवलं कृत्य, चौकशीत आरोपीनं सगळचं सांगितलं!

Pune Crime : बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे; इतर दोन आरोपींचा शोध अद्याप सुरूच

Women's T20 World Cup: निराश नका होऊ! टीम इंडिया अजूनही Semi Final ला जाणार; दुसऱ्या पराभवानंतर वाचा कसं आहे गणित

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध रोमांचक विजय, Semi-Final मध्येही मारली धडक; हरमनप्रीतची फिफ्टी व्यर्थ

Football India: व्हिएतनामविरुद्धचा सामना ड्रॉ; कोच मॅनोलो मार्क्वेझ यांच्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा लांबली

SCROLL FOR NEXT