मुंबई - एसटी महामंडळाच्या स्टेट को-ऑपरेटीव्ह बँकेत संचालक मंडळ निवडूण आणल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. नव्या संचालकांच्या पहिल्या बैठकीत याची चूणूक दिसून आली. बँकेच्या सर्व शाखांत पाकिस्तान,अफगाणीस्तानसह अंखड भारताचा नकाशा लावणे, सर्व शाखेत गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांचे फोटो लावा असा अजब प्रस्ताव यामध्ये मांडण्यात आले.
एसटी बँकेच्या सोमवारी झालेल्या बैठकीत एकुण २४ ठराव मांडले गेले. यामध्ये भारतीय तिंरग्यासोबत, अंखड भारताचा नकाशा लावण्याचा वादग्रस्त ठरावाचा समावेश होता. यामुळे नवा वाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे.
यापुर्वी संचालक मंडळाच्या निवडणूक जिंकल्यावर नथुराम गोडसेंच्या जयघोषणांमुळे गुणरत्न सदावर्ते यांनी वाद उत्पन्न केला होता.या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सदावर्ते यांना जाहिर कानपिचक्या दिल्या होत्या.
मात्र संचालक मंडळाच्या सभेतील ठराव पाहता सदावर्ते आपल्या हिंदुत्वाच्या अजेंड्यापासून दूर हटले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिकृत नकाशाऐवजी अंखड भारताच्या नकाशा लावण्याचा अट्टाहास का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
यापुर्वी नव्या संसदेत अंखड भारताचे शिल्प लावल्यामुळे नेपाळसह बांग्लादेशाने त्यांच्या पध्दतीने निषेध व्यक्त केला होता. अंखड भारताचा नकाशा सार्वजनिक ठिकाणी कसा लावला जावू शकतो यावर अनेक कायदेतज्ञांनी आक्षेप घेतले आहे.
अखंड भारत ही संकल्पनाच मुळात काल्पनीक आहे. भारतीय संविधानाने भारताच्या नकाशाच्या सीमा आखून दिल्या आहे. जो भारताचा भाग नाही त्याला जोडून अखंड भारत म्हणणे चुकीचे आहे. त्यामूळे संविधानाने मान्यता दिलेल्या भारतीय नकाशात ,पाकिस्तान, अफगानीस्तान,नेपाळसह इतर देश जोडणे. हा भारतीय नकाशाचे विद्रुपीकरण करण्याचा प्रकार आहे.
- असिम सरोदे, जेष्ठ कायदेतज्ञ
ठराव
- मोबाईलवर हॅलो ऐवजी वंदे मातरम
- प्रत्येक शाखेत तुळशीचे रोपटे लावावे
- अखंड भारताचा नकाशा व सदावर्ते कुटुंबांचे फोटो लावावे
- विना जामीन कर्ज देण्यात यावे.
- सभासदांचा मृत्यू झाल्यास विमा कवच
- सर्व बैठका युट्युबवर लाईव याव्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.