Eknath shinde and Manoj Jarange Patil 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Andolan : पवार-फडणवीसांच्या गैरहजेरीत जरांगेंची भेट घेऊन शिंदेंनी 'अशी' साधली संधी

Komal Jadhav (कोमल जाधव)

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आणि राज्य सरकारला सळो की पळो करुन सोडणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी १७ दिवसांनंतर उपोषण मागे घेतलं. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खुद्द जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावात पोहचले. शिंदेंच्या हातून ज्युस पिऊनच जरांगे पाटलांनी आपलं उपोषण सोडलं.

मराठा आरक्षणाच्या इतिहासात सर्वाधिक काळ चाललेलं आणि सर्वाधिक प्रतिसाद मिळालेलं हे आंदोलन असावं अशी चर्चा आहे. कारण फडणवीस-अजितदादा हे दोन शिलेदार गैरहजर असतानाही शिंदेंनी मार्ग कसा काढला? याचा शिंदेंना कसा फायदा होणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सर्व प्रसिद्धी शिंदेंना मिळाली

मनोज जरांगेंनी उपोषण सोडताना दोन्ही राजे म्हणजे उदयनराजे आणि संभाजीराजे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री, सगळं मंत्रिमंडळ उपोषणस्थळी असावं, अशी अट घातली होती. पण, आज उपोषण सोडतेवेळी फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सरकारी शिष्टमंडळातील काही मंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. त्यामुळे फडणवीस-अजितदादा हे सत्तेतले दोघे भागीदार अन् शिलेदार नसतानाही शिंदेंनी मराठा आरक्षणप्रश्नी मार्ग काढला. त्यामुळे मराठा समाजात आणि माध्यमांमध्ये सगळीकडे शिंदेंचीच चर्चा झाली

अजितदादांची गैरहजेरी, शिंदेंनी साधली संधी

अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे आणि त्यांच्या केमिस्ट्रीमुळे एकनाथ शिंदे अनेकदा अडचणीत आलेले दिसतात. मंत्रिमंडळ बैठकीतही अनेकदा मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री एकमेकांवर कुरघोड्या करतानाही दिसतात. मनोज जरांगेंनी केलेल्या आंदोलनात पोलिसांच्या लाठीचार्जमुळे फडणवीसांची राजकीय कोंडी झाली. तर, दुसरीकडे पण, मराठा आरक्षणाचा मुद्दा असताना आणि संपूर्ण घटना मराठा समाजाभोवती फिरत असतानाही अजितदादा स्वत: वा त्यांच्या गटातील कोणत्याही नेत्यानं मनोज जरांगे पाटलांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली नाही. त्यामुळे अजितदादांची आजची गैरहजेरीचा फायदा घेत शिंदेंनीही चांगलीच संधी साधली.

एकनाथ शिंदेंच्या प्रतिमेला फायदा

प्रोटोकॉल बाजूला ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यात दाखल झाले. खरंतर कालच मुख्यमंत्री शिंदे मनोज जरांगेंच्या भेटीला जाणार होते, त्यांचा तसा दौराही ठरला होता. पण, अचानक शिंदे-फडणवीस-अजितदादांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळेच शिंदेंचा दौरा रद्द झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. मग शिंदेंनीही तात्काळ पत्रकार परिषद घेत त्या व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर आज सकाळीसकाळी शिंदेंनी जालना गाठलं. मग त्यांच्या हातून ज्युस पिऊन जरांगेंनी उपोषण सोडलं. त्यामुळे अजितदादा-फडणवीसांमुळे झाकोळलेल्या शिंदेंच्या प्रतिमेला आजच्या घटनेमुळे नक्कीच तेज मिळालं, ही शंका नाकारता येत नाही

जरांगेंना एकनाथ शिंदेंवरच विश्वास

मनोज जरांगे यांनी उपोषण सोडताना म्हटलंय, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची क्षमता कोणात असेल तर ती फक्त मुख्यमंत्री शिंदेंमध्ये आहे, असं म्हणत मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदेंवर विश्वास दाखवला. आंदोलनाचा चेहराच सत्ताधाऱ्यांवर विश्वास दाखवत असेल तर समाजही त्याकडे आशेच्या नजरेनं पाहतो हे नक्कीच.

मराठा चेहरा!

मनोज जरांगेंचं उपोषण सोडण्यासाठी खरंतर शिंदे जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावात गेले होते. जरांगेंचं उपोषण सोडवल्यानंतर शिंदेंनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या वडिलांचा किस्सा सांगितला. तो म्हणजे साताऱ्याला जेव्हा मागच्या वेळी आपलं आंदोलन होतं. तेव्हा गावी असलेले शिंदेंचे बाबा तयारी करत होते. शिंदेंनी त्यांच्या बाबांना विचारलं, काय चाललंय? कुठे चालला? तर त्यांचे बाबा म्हणाले आपल्या मोर्चाला चाललोय. शिंदेंनी विचारलं कसला मोर्चा तर म्हणाले मराठा क्रांती मोर्चा. त्यामुळे आज शिंदेंनी मीही मराठा असल्याचं सांगण्याचा एकप्रकारे प्रयत्नच केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: पुण्यात दोन तरुणांची हुल्लडबाजी, रिल्ससाठी जीव घातला धोक्यात! व्हिडिओ पाहून बसेल धक्का

अरे देवा! Babar Azam ला आता झिम्बाब्वेविरुद्ध नाही खेळता येणार; PCB ने घेतला मोठा निर्णय, कॅप्टनशिवाय निवडले संघ

Nanded : ईव्हीएम फोडणे, व्हिडिओ काढणे पडले महागात,लोकसभा निवडणुकीत दाखल झालेले २३ गुन्हे न्यायालयात

Jayashree Thorat: जयश्री थोरातांवरच गुन्हा दाखल! वसंत देशमुखांवर काय कारवाई झाली? संगमनेरात संतापाची लाट

Bandra Terminus Stampede: वांद्रे टर्मीनसवर नेमकं काय घडलं? घटनेचे भयंकर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT