Devendra Fanavis, Eknath Shinde and Ajit pawar  
महाराष्ट्र बातम्या

Maratha Andolan : CMच्या 'बोलून मोकळं व्हायचं', ‘त्या’ व्हिडीओवर ओमराजे संतप्त; म्हणाले, 'मराठा आरक्षणाविषयी…

रवींद्र देशमुख

मुंबई - मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार सांगितलं आहे. तसंच मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंतीही केली. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओवरून या तिघांनाही ट्रोल केलं जातं आहे.

आपण बोलून मोकळं व्हायचं असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंबंधी जी बैठक झाली त्यानंतरच्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला बोलताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये नेमका काय संवाद?

एकनाथ शिंदे – आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.

अजित पवार – हो……येस

देवेंद्र फडणवीस – माईक चालू आहे.

मराठा आरक्षणाबाबत जी चर्चा झाली त्यानंतर पत्रकार परिषदेत भूमिका मांडण्याआधी हा संवाद झाला असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल केलं जातं आहे.

संभाजी भिडे यांनी मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लबाड नाहीत, फडणवीस फसवणूक करणार नाहीत आणि अजित पवार काळीज असलेला माणूस आहे अशी भावनिक साद मनोज जरांगे पाटील यांना घालत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्याचाही संदर्भ या व्हिडीओमध्ये देऊन या तिघांनाही ट्रोल केलं जातं आहे.

दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

काय म्हटलं आहे ओमराजेंनी?

मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे. मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव पोटतिडकीने राज्यभर आंदोलन करीत आहेत. अनेकांनी अन्नत्याग केला आहे. विविध माध्यमातून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आपला मराठा तरुण करताना दिसतो आहे. तरीही हे सरकार केवळ वेळकाढूपणा करीत आहे.

एकीकडे समाज जीवन मरणाचा संघर्ष शांततेच्या माध्यमातून करीत असताना सरकारचे हे ट्रीपल इंजिन बघा किती गांभीर्याने हा विषय घेत आहेत.. आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा पण, किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका. समाज आता तुमच्याकडे डोळसपणे बघतोय…असं ट्वीट ओमराजेंनी केलं आहे.

आता याबाबत सरकाकडून काही स्पष्टीकरण दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT