Eknath shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

मराठा समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय! आण्णासाहेब पाटील मंडळाला निधीची घोषणा

यासंदर्भातील जीआर सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : शिंदे आणि भाजप सरकारकडून मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजातील तरूणांना उद्योगासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून १० लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्यात येते. या मंडळासाठी निधी देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यासंदर्भातील जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. (Annasaheb Patil Economic Backward Development Corporation fund)

सरकारने प्रसिद्ध केलेल्या या जीआरनुसार आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला ३० कोटींचा निधी देण्याची घोषणा सरकारने केली आहे. हा निधी लवकर वाटप करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासंदर्भात मराठा समन्वयाकांची निधी मिळण्यासाठी मागणी सरकारकडे केली होती. या मागणीची दखल घेत सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाने हे आदेश वित्त विभागाच्या माध्यमातून काढले असून हा निधी वाटप होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यापूर्वी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधी मिळत नसल्यामुळे मराठा समाजाकडून तक्रारी केल्या जात होत्या. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे मराठा समाजातील तरूणांना चांगला फायदा होणार आहे.

काय आहे आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची योजना?

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मराठा समाजातील तरूणांना उद्योग करण्यासाठी १० लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. मराठा आरक्षणासंदर्भात मोर्चे काढले जात होते तेव्हा सरकारने हा निर्णय मराठा समाजातील तरूणांसाठी घेतला होता. यासंदर्भात आपण आपल्या घराजवळ असलेल्या स्थानिक सरकारी बँकेत चौकशी करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik: काँग्रेसच्या रॅलीतील महिलांचे फोटो काढा, त्यांची व्यवस्था करू, धनंजय महाडिकांची लाडक्या बहिणींना दमदाटी!

Mahayuti: ओबीसी एकीकरणावर भाजपचा भर तर मुख्यमंत्र्यांची मराठा समाजाला साद, काय आहे महायुतीचा प्लॅन?

Latest Marathi News Updates : पुणे हॉटेल संघटनेच्यावतीने मतदारांच्या देयकावर १० टक्के सवलत

Sakal Podcast: अमेरिकेत नोकरीचं स्वप्नं पूर्ण होणार का? ते राम मंदिर उभारणीस विलंब होण्याची शक्यता

Railway: रेल्वेत फुकट्या जाहिराती लावणाऱ्यांवर कारवाई करा; प्रवाशांची मागणी

SCROLL FOR NEXT