Manoj Jarange-Patil Satara Sabha  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : दुसरीकडून कुठूनही नाही, आता मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार; साताऱ्यात जरांगे-पाटलांचा निर्धार

मराठ्यांचा (Maratha Reservation) ओबीसीत समावेश झाल्यात जमा आहे. त्यामुळे काही लोक चलबिचल झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

'आरक्षणाची लढाई शेवटच्या टप्प्यात आली आहे. अशी संधी पुन्हा नाही. या संधीचे सोने करा.'

सातारा : मराठ्यांचा (Maratha Reservation) ओबीसीत समावेश झाल्यात जमा आहे. त्यामुळे काही लोक चलबिचल झाले आहेत. लढाई अखेरच्या टप्प्यात आली आहे. मराठ्यांना चारही बाजूने घेरले जातेय. त्या सगळ्यांनाच पूर्ण ताकदीनिशी खेटायचे आहे. मराठा फक्त आणि फक्त ओबीसीतूनच (OBC Community) आरक्षण घेणार, दुसरीकडून कुठूनही नाही, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी दिला.

घाबरून घरात बसलो, तर भावी पिढ्या बरबाद होतील. त्यामुळे गाफील राहू नका. शांततेच्या युद्धासाठी आजपासून कामाला लागा. गावागावांत भक्कम एकजूट करा, असे आवाहन करतानाच आरक्षण मिळाल्याशिवाय कोणत्याही स्थितीत एक इंचही मागे हटणार नाही, असा निर्धारही मनोज जरांगे-पाटील यांनी साताऱ्यात जाहीर सभेत केला.

गावगाड्यात सलोखा ठेवा

मराठा समाजाच्या नोंदी सापडताहेत, हे समोर आल्यावर सामान्य ओबीसी समाज मराठ्यांच्या बाजूने उभा आहे. मराठ्यांच्या हक्काचे त्यांना मिळाले पाहिजे हे त्यांना पटलंय, तरी काही नेते समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आरक्षण मिळणार हे लक्षात आल्याने राजकीय स्वार्थासाठी काही नेत्यांचा कळप तयार झाला आहे. त्यांचा डाव हाणून पाडा. गावगाड्यातील आपला सलोखा कोणत्याही परिस्थितीत बिघडता कामा नये, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी या वेळी केले.

मराठ्यांना दोन अंगे

मराठ्यांची लढाऊ क्षत्रीय व धान्य पिकविणारा शेतकरी ही दोन अंगे आहेत. कुणबी म्हणजे शेती करणारा; परंतु ते समजून न घेता काही जण कुणबी नको असे म्हणत आहेत. मात्र, ९९ टक्के समाजाला ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण पाहिजे. कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले. आधी आरक्षण मगच राजकारण मराठा आरक्षण निर्णायक टप्प्यात आले आहे.

आता प्रत्येक जण केवळ आंदोलनाच्या प्रचारातच कार्यरत राहिला पाहिजे. महिलांनीही न लाजता त्यात पुढाकार घ्यावा. २४ डिसेंबरपर्यंत गावागावांत आरक्षण आंदोलनाचा प्रचार करा. जागृती करा. घरातला गडी जर कोणत्या नेत्याच्या सोबत निघाला, तर त्याला घरातच बांधून ठेवा. आधी आरक्षण मगच राजकारण याची खूणगाठ प्रत्येक मराठ्याने मनात बांधा, असेही त्यांनी नमूद केले.

अशी संधी पुन्हा नाही

जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘आरक्षणाची लढाई शेवटच्या टप्प्यात आली आहे. अशी संधी पुन्हा नाही. या संधीचे सोने करा. कोणत्याही पक्षाचा नेता आपल्या मदतीला येईल, अशी चिन्हे नाहीत. आपला लढा आपल्यालाच लढावा लागणार आहे. २४ डिसेंबरपर्यंत सरकार आरक्षण देणार आहे. नाही दिले, तर त्यांना सुटी नाही. सर्वांनी अखेरच्या लढाईची तयारी करा.’’

जरांगे पाटील म्हणाले...

  • सामान्य मराठ्यांच्या पोरांना शिक्षण व नोकरीत अडचणी म्हणून हा लढा

  • मराठे पूर्वीपासून ओबीसीत; पण सत्ताधाऱ्यांनी ओबीसी नेत्यांच्या दबावाने आजवर ते मिळू दिले नाही

  • आरक्षण न मिळाल्याने मराठ्यांच्या पोरांच्या स्वप्नांची राखरांगोळी

  • आधीच्या समित्यांना पुरावे मिळाले नाहीत, आता कसे मिळताहेत याचा जाब सत्ताधाऱ्यांनी द्यावा

  • शिंदे समितीला लाखोंच्या संख्येने पुरावे मिळत आहेत. त्यामुळे ७० वर्षांचा बॅकलॉगही भरला पाहिजे

  • या नोंदीचा अहवाल स्वीकारून २४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण देण्याचे ठरले आहे

  • आरक्षण मिळू नये म्हणून मराठ्यांना घेरण्याचे षडयंत्र सुरू आहे

  • शांततेच्या आंदोलनामुळेच आरक्षण निर्णय प्रक्रियेत आले आहे.

  • ती कधीही सोडू नका

  • टीका करणाऱ्यांकडे आरक्षण मिळाल्यावर बघू. तोपर्यंत संयम सोडू नका

  • एक डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करा

  • जिल्ह्यातील मराठा बांधवांनी एकजूट दाखविली. त्यांच्या ऋणात राहीन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT