गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू आहे. या संघर्षाला सर्वच राजकीय पक्षांचे नेते खतपाणी घालत आहेत.
पंढरपूर : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टार्गेट करत आहेत. या पाठीमागे मोठे राजकीय षडयंत्र आहे. ओबीसींची मते भाजपाला जावीत यासाठीच जरांगे हे फडणवीस यांच्यावर सतत टीका करत आहेत. जरांगे आणि फडणवीस यांचे हे भांडण नकली आहे. त्यामुळे त्यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत, असा हल्लाबोल अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला.
प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव रॅली पंढरपुरात आली होती. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील व शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेला मनोज जरांगे-पाटील कसे उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अॅड. आंबेडकर म्हणाले, ओबीसी आणि मराठा आरक्षण वादावर शरद पवारांनी पळवाट काढली आहे. मराठा आणि ओबीसी वादावर तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील, छगन भुजबळ व लक्ष्मण हाके यांना एकत्र बसवून हा प्रश्न सोडवावा, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.
शरद पवारांच्या आवाहनानंतर प्रकाश आंबेडकरांनी पवारांवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार हे एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते गेले अनेक वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिलेले ज्येष्ठ नेते आहेत. खरं तर त्यांनीच मराठा-ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. परंतु, तसं त्यांनी धाडस दाखवलं नाही. आता या प्रश्नावरून पळवाट काढण्यासाठीच त्यांनीही युक्ती केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू आहे. या संघर्षाला सर्वच राजकीय पक्षांचे नेते खतपाणी घालत आहेत. आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील हे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत. परंतु, जरांगे पाटील यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात हे वेगवेगळे आहेत. मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे भांडण नकली आहे.
ओबीसीची मतं ही भाजपला मिळावीत यासाठीच जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत असल्याचा गंभीर आरोपी यावेळी आंबेडकर यांनी केला आहे. मराठा समाजाची मतं आपल्यातून दूर जातील या भीती पोटी शरद पवार आणि बाळासाहेब थोरात ओबीसी प्रश्नावर बोलत नाहीत, असेही यावेळी आंबेडकर यांनी स्पष्ट केले. यावेळी बहुजन वंचित आघाडीचे नेते रमेश बारस्कर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.