Maratha Rervetation JARANGE PATIL  SAKAL
महाराष्ट्र बातम्या

Maratha Rervetation: मराठ्यांवर हल्ला केला म्हणून त्यांना बढती मिळणार असेल - मनोज जरांगे पाटील

Maratha Rervetation: जरांगे पाटील यांची तुषार दोशी यांच्या बदलीवर प्रतिक्रिया

शर्मिाला वाळुंज

Maratha Rervetation: जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या आंदोलनावेळी गोळीबाराच्या घटनेनंतर सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आली.

त्यावर आता जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आम्हाला मारल्याचे त्यांना बक्षीस मिळाले असेल .निष्पाप जनतेवर कट रचून ज्यांनी हल्ला केला त्यांना बढती मिळणार असेल तर याची माहिती घेईन .त्याच्यावर न्यायालयीन चौकशी बसणार मात्र यातून कोणालाही सुट्टी मिळणार नाही असे ते म्हणाले. ते कल्याण मधील जाहीर सभेनंतर पत्रकारांशी बोलत होते.

फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले नाहीत तर तो मधला माणूस कोण हे शोधलं पाहिजे. लाठीचार्ज करणारा कोण हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी शोधून काढावे अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे यावेळी जरांगे पाटलांनी सांगीतले.

माझ्यामागे सामान्य मराठ्यांची शक्ती

माझ्या पाठीमागे कोणीतरी आहे हे राज ठाकरेंचं म्हणणं बरोबर आहे. माझ्यामागे सामान्य मराठ्यांची शक्ती आहे. स्क्रिप्ट वगैरे मी वाचत नसतो वाचून माणूस एवढा बोलू शकत नाही अशी जरांगे पाटलांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT