Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : तोडगा निघणार? मुख्यमंत्री शिंदे मनोज जरांगे पाटील यांच्यात फोनवर 24 मिनिटे चर्चा

रोहित कणसे

राज्यात मराठी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे करत असलेल्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. मराठा आंदोलनाला कालपासून राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील अनेक भागात आंदोलकांनी नेत्यांच्या घरावर दगडफेक करत जाळपोळ केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज फोनवरून जरांगे यांच्याशी चर्चा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात फोनवर तब्बल 24 मिनिटे चर्चा झाली. थोड्या वेळात अभ्यासक बोलावणार आणि चर्चा करून पुन्हा मुख्यमंत्री यांच्याशी जरांगे बोलणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अर्धवट आरक्षण नको, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही मागणी केली. जरांगे पाटील हे मराठा अभ्यासकांसोबत चर्चा करुन पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत.

मराठा आरक्षणासाठी हलचालींना वेग

राज्यात अनेक ठिकाणी मराठा आंदोलक हिंसक झाल्याचे पाहायला मिळत आहे. बीडमध्ये आममदारांची घरे पेटवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत हालचाली सुरू होत्या.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन त्यात मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याच्या मुद्द्यावर सरकारमधील तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजप कोअर कमिटीची बैठक घेतली. या बैठकिनंतर ओबीसी नेते छगन भुजबळ व प्रकाश शेंडगे हेही सागर बंगल्यावर दाखल झाले. पाऊण तासाच्या बैठकिनंतर उपमुख्यमंत्री वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झाले.

वर्षावरील कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या बैठकिनंतर शिंदे व फडणवीस यांच्यातही बंदद्वार चर्चा झाली. तर आज शिवसेना आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

में यूपी से हू; मराठी नही आती...! मुंबई मेट्रोवनमधील कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, मराठी एकीकरण समितीकडून करेक्ट कार्यक्रम

Ranji Trophy 2024: साई सुदर्शनचे द्विशतक, Ishan kishan चे शतक, तर वॉशिंग्टन सुंदरची तुफान फटकेबाजी

आणि त्याने लगेच पाण्यात उडी मारली... 'राजा राणी'च्या सेटवर सुरज चव्हाणने वाचवला एकाचा जीव

Worli Assembly Constituency: वरळीत तिरंगी लढतीची शक्यता, आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढणार!

Latest Maharashtra News Updates : सायन-पनवेल उड्डाणपुलाखाली उभारणार स्वच्छतागृहे

SCROLL FOR NEXT