महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : सगेसोयऱ्यांना पर्याय शपथपत्राचा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातून मोठा तोडगा निघणार

संतोष कानडे

वाशीः मुंबईतल्या वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलकांशी संवाद साधत आहे. सरकराच्या शिष्टमंडळासमोबत नेमकी काय चर्चा झाली, याविषयी ते माहिती देत आहे.

जरांगे पाटील यांनी मांडलेले मुद्दे...

  • ज्याच्या नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनी अर्ज करणंही गरजेचं आहे. सरकार आपल्या स्तरावरुन प्रयत्न करणार आहे. ग्रापमपंचायत पातळीवर यादी लावली जाईल आणि शिबिरं घेऊन कुणबी प्रमाणपत्र वाटप केले जातील. मराठा समाजाने स्वतःहून पुढे होऊन नोंदी शोधण्यासाठी आणि प्रमाणपत्र वाटपासाठी मदत केली पाहिजे.

  • ५४ नव्हे तर ५७ लाख नोंदी मिळालेल्या आहेत. मराठे मुंबईकडे निघाल्यानंतर आणखी नोंदी वाढल्याचं सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सांगितलं आहे. शिवाय आतापर्यंत ३७ लाख प्रमाणपत्र वितरित केलेले आहेत.

  • सरकारने शिंदे समितीची मुदत दोन महिने वाढवली आहे. परंतु ती वर्षभर वाढवावी. समितीचं काम सुरुच राहिलं पाहिजे, अशी मागणी मागणी आहे. ज्याची नोंद मिळाली त्या आधारावर त्याच्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करा, अशी मागणी आहे. त्यासाठीचा अध्यादेश आपल्याला महत्त्वाचा आहे.

  • ५७ लाख नोंदी आणि त्यांच्या परिवारात, सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतांना शपथपत्र घ्या. हा माझा सोयरा आहे, असं शपथपत्र देऊन प्रमाणपत्र द्या.. ही मागणी आपली आहे. शपथपत्र दिल्यानंतर तो व्यक्ती खराय की खोटा, हे तपासण्यासाठी गृहचौकसी करावी. असं सरकारकने मांडलं आहे.

  • अंतरवालीसह राज्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, ही मागणी आहे. परंतु त्याबाबतचा निर्णय आम्हाला आणून द्यावा.

दरम्यान, सगेसोयऱ्याचा अध्यादेश आज रात्रीपर्यंत द्या नाहीतर उद्या मी आझाद मैदानाकडे कूच करेल, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव भांगे यांनी अध्यादेश तयार असून सर्व सचिवांच्या सह्या आणि मुख्यमंत्र्यांच्या सह्या झाल्याचं नमूद केल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ते पुन्हा आले! US Presidential Election मध्ये शानदार विजय, पहिल्याच भाषणात Donald Trump काय म्हणाले?

Vicky Kaushal : विकी कौशलने घेतला पुष्पा 2चा धसका ; छावाची रिलीज डेट बदलणार ?

Latest Marathi News Updates live : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल आता पुढच्या वर्षात येण्याची शक्यता

Share Market Closing: सेन्सेक्स 900 अंकांनी वाढला; निफ्टी 24,500 च्या जवळ, ट्रम्प यांच्या विजयामुळे आयटी शेअर्स तेजीत

भ्रष्ट नेत्यांनाच पुन्हा तिकीट का देता? नाना पाटेकरांचा थेट सवाल; फडणवीसांच्या उत्तराने उंचावतील भुवया

SCROLL FOR NEXT