महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: "मराठा आंदोलन भरकटलंय, जरांगेंनी विचार करावा"; CM शिंदेंचं आवाहन

मराठा आंदोलकांनी बीडचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकी यांच्या घराला आग लावली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : एकीकडं मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं शांततेत उपोषण आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडं आरक्षण समर्थकांनी हिंसक पवित्रा घेतला आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

तसेच राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकी यांच्या घराची जाळपोळ झाल्याच्या घटनेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Maratha Reservation agitator is misguided Manoj Jarang should think about it CM Eknath Shinde appeal)

आंदोलनाला गालबोट लागता कामा नये

मुख्यमंत्री या जाळपोळीच्या घटनांवर भाष्य करताना म्हणाले की, "मराठा आरक्षणाचं आंदोलन आता वेगळं वळण घेत आहे, ते भरकटलं आहे. याची मनोज जरांगे यांनी नोंद घ्यावी. तसेच मला वाटतं दोन्ही बाजूंनी आपण पुढे जात आहोत. (Latest Marathi News)

या आंदोलनाला कुठलंही गालबोट लागता कामा नये. मराठा समाजाच्या आडून कोणी अशा प्रकारच्या ज्या घटना होत आहेत त्या घडवू इच्छित आहे का? याचा विचार देखील मराठा समाजानं केला पाहिजे," असं आवाहनही त्यांनी केलं.

मराठा समाज शिस्तप्रिय

राज्यातील जनतेला देखील मी शांततेचं आवाहन करतो की, राज्यात कायदा सुव्यवस्था आबाधित राखणं ही सरकारची जशी जाबाबदारी आहे, तशीच नागरिकांचीही आहे. मराठा समाजाला कुठलाही गालबोट लागू नये याची काळजी मराठा क्रांती मोर्चानं घेतली मनोज जरांगेंनी घेतली पाहिजे.

आज मराठा समाज काही ठिकाणी शिस्तप्रिय आहे शांत आहे. पण काही लोक कायदा सुव्यवस्था हातात घेऊन जाळपोळ सुरु आहे. याबाबत सामाजानं सजग व्हायला पाहिजे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. (Marathi Tajya Batmya)

मुलाबाळांचा विचार करा, त्यांना वाऱ्यावर सोडू नका

माझी विनंती आहे की गेल्यावेळी मराठा आरक्षणासाठी ५८ शिस्तबद्ध मोर्चे निघाले, त्याला गालबोट लागलं नाही. परंतू आज दुर्दैवानं काही लोकं कायदा व सुव्यवस्था हातात घेत आहेत जाळपोळ सुरू आहे. मराठा समाजाने सजग होऊन याकडं पाहिलं पाहिजे.

माझी विनंती आहे की नागरिकांनी टोकाचं पाऊल उचलू नये. मुलाबाळांचा कुटु़बांचा विचार करा, त्यांना वाऱ्यावर सोडू नका. (Latest Marathi News)

जरांगेंचा लढा गांभीर्यानं घेतला

आम्ही कुणालाही फसवणार नाही उसवू इच्छित नाही. सरकारने जनतेला फसवलं हे आम्ही होऊ देणार नाही. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण आम्ही देणार आहोत. याबाबत सर्व यंत्रणा काम करत आहे. जरांगे पाटलांच्या तब्येतीचीही आम्हाला काळजी आहे.

मराठा समाजाचा जरागे पाटलांचा लढा हा सरकारने गांभीर्याने घेतला आहे. झटकन हा निर्णय सरकार घेऊ शकत नाही. कारण ते आरक्षण कायद्याच्या चौकटीत मिळावं ही आमची भावना आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT