maratha reservation  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न; कठोर कारवाईच्या सूचना...

सोशल मिडियाच्या माध्यमातून मराठा आंदोलन हिंसक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रकार महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या निदर्शनास आला आहे

रोहित कणसे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यत मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला जागोजागी हिंसक वळण लागल्याचे प्रकरा समोर आले आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आदारांच्या घरांवर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. यादरम्यान आता हिंसाचार करणाऱ्या समाजकंटकांविरोधात पोलीसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून मराठा आंदोलन हिंसक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रकार महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या निदर्शनास आला आहे. मराठा आरक्षणाबाबत सोशल मिडियावर भडकावू व्हिडीयो पोस्ट आणि आवाहन करणाऱ्या २९ आक्षेपार्ह व्हिडीयो पोस्ट पोलिसांना आढळल्या आहेत.

या संबधित व्हिडीयो पोस्ट करणाऱ्यांमध्ये समाजकंटाकांचाही समावेश असल्याची सूत्रांची माहीती आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून आयटी अॅक्ट अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. काही समाजकंटक आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलकांनी कायदा हातात घेतल्यास पोलिसांनाही कायदेशीर कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

फडणवीस काय म्हणाले?

मराठा आंदोलनादरम्यान बीडसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जाळपोळ झाली.आमदार, लोकप्रतिनिधींची घरे, कार्यालये आणि वाहने जाळण्यात आली. या घटनांची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून गालबोट लावणाऱ्यांविरुद्ध थेट हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखले केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.

‘‘मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक पावले उचलत आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः आरक्षणासंदर्भात आश्वासन दिले आहे. त्यानुसार राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात पूर्णपणे वचनबद्ध आहे. मात्र असे असतानाही जाळपोळीच्या घटना घडणे हे दुर्दैवी आहे,’’ अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

काहीजण या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन हिंसा करण्याचा प्रयत्न करताहेत. विशेषतः ज्या प्रकारे सोमवारी (ता.३०) काही लोकांनी लोकप्रतिनिधींची घरे जाळली. काही विशिष्ट समाजाच्या लोकांना लक्ष्य करत त्यांचे हॉटेल, दवाखाने जाळले हे अत्यंत चुकीचे आहे.

या सर्व घटनांची राज्य सरकारने अतिशय गांभीर्याने दाखल घेतली असून या सगळ्यांवर पोलिस आणि गृह विभाग कडक कारवाई करेल. विशेषतः लोक घरात असताना घरे जाळण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, त्याचे सगळे व्हिडिओ, फुटेजस् मिळालेले आहेत. ५०-५५ लोकांची ओळखही पटली आहे. उरलेल्यांची ओळख पटविली जात आहे, असेही फडवीसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Supriya Sule: बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात; पण मुलांच्या शिक्षणासाठी निधी नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT